शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहती वगळण्याची विनंती

By admin | Updated: April 3, 2017 01:16 IST

वसाहती वगळण्याची विनंती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले़

पुणे : डॉ़ कस्तुरीरंगन समितीने, पश्चिम घाट हा पर्यावरण क्षेत्र तयार करण्यासाठी केलेल्या शिफारसींमुळे औद्योगिक वसाहतीवर परिणाम होऊन विकासाला खीळ बसणार असेल तर या वसाहती वगळण्याची विनंती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले़ अ‍ॅड़ जयदेवराव गायकवाड यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही ग्वाही दिली़ महाराष्ट्रातील उद्योग समूहासमोर निर्माण झालेल्या या संकटांची माहिती या लक्षवेधीतून दिल्याचे अ‍ॅड़ गायकवाड यांनी सांगितले़ अ‍ॅड़ गायकवाड म्हणाले, की डॉ़ माधव गाडगीळ आणि डॉ़ कस्तुरीरंगन समितीने देशभरातील ५६ हजार ८२५ वर्ग किलोमीटर एवढा भाग हा पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केला आहे़ त्यात रोहा, नागोठणे अशा एकूण राजगड व कोल्हापूर भागातील एकूण १५ औद्योगिक वसाहतींचा समावेश हा पर्यावरण संवेदनशील भागात झाला आहे़ त्यामुळे हे उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे ५ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही उपस्थित झाला आहे़ केंद्र सरकारच्या २८ फेबु्रवारी २०१७ च्या गॅझेटनुसार ६० दिवसांच्या आत हरकती नोंदविणे गरजेचे आहे़ मात्र हरकती न नोंदविल्यास हे उद्योग बंद पडणार आहेत़ त्यामुळे सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड़ गायकवाड यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील उद्योग समूहासमोर निर्माण झालेल्या या संकटांची माहिती लक्षवेधीद्वारे विधान परिषदेत मांडण्यात आली होती.केंद्र सरकारचे औद्योगिक क्षेत्रातील समस्येकडे लक्ष वेधण्यचा प्रयत्न केल्याचे अ‍ॅड. गायकवाड म्हणाले.