शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

"इंदू सरकार" विरोधात काँग्रेस आक्रमक, मधूर भांडारकरांना कडेकोट सुरक्षाव्यवस्था

By admin | Updated: July 17, 2017 14:20 IST

मधूर भांडारकर दिग्दर्शित "इंदू सरकार" चित्रपटावरुन सध्या वादंग सुरु असून काँग्रेस कार्यकर्ते चित्रपटाच्या प्रमोशनाचे कार्यक्रम उधळून लावत आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 -  मधूर भांडारकर दिग्दर्शित "इंदू सरकार" चित्रपटावरुन सध्या वादंग सुरु असून काँग्रेस कार्यकर्ते चित्रपटाच्या प्रमोशनाचे कार्यक्रम उधळून लावत आहे. यामुळेच राज्य सरकारने मधूर भांडारकरांना सुरक्षा पुरवली आहे. शनिवारी पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद उधळून लावली होती. पुण्यापाठोपाठ रविवारी नागपुरातही चित्रपटविरोधात काँग्रेसने आंदोलन केल्याने भांडारकर यांना दोन वेगवेगळया ठिकाणी आयोजित कलेली पत्रकार परिषद रद्द करावी लागली. या प्रकारामुळे संतापलेल्या भांडारकर यांनी राहुल गांधींना ट्विट करून ‘या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का?’ असा सवाल केला होता.
 
संबंधित बातम्या
मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?
हा तर कॉंग्रेसचा वाह्यातपणा, मधुर भांडारकर
माझं तोंड काळं केल्यानं इतिहास बदलणार नाही : मधुर भांडारकर
पुणे - "इंदू सरकार" चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा
 
चित्रपटाला होणारा विरोध आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची तीव्र आंदोलनं लक्षात घेत राज्य सरकारने मधूर भांडारकर यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.  28 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होईल.
 
राहुल गांधींकडे व्यक्त केला संताप
आणीबाणीवर आधारित ‘इंदू सरकार’ चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या विरोधाला दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. संतापलेल्या भांडारकर यांनी राहुल गांधींना ट्विट करून ‘या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?’ असा थेट सवाल केला.
 
चित्रपट न पाहताच गोंधळ घालणे आणि बोलण्याची संधी न देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. हा चित्रपट काल्पनिक असून कॉंग्रेसची भूमिका अयोग्य आहे, असे भांडारकर म्हणाले. हा चित्रपट कुठल्याही राजकीय पक्षाने ‘स्पॉन्सर’ केला नाही. जर असे असते तर मी १०० टक्के चित्रपट पूर्णपणे आणीबाणीवरच काढला असता आणि निवडणुकांच्या वेळी प्रदर्शित केला असता, असे भांडारकर यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांनी बोलताना सांगितले.
 
‘सेन्सॉर’ने या चित्रपटात १७ ‘कट’ करण्यास सांगितले आहे. मात्र माझी त्यासाठी तयारी नाही. याबाबत कायदेशीर दाद मागण्यात येईल व ‘ट्रिब्युनल’मध्ये जाण्यास तयार आहोत. एखाद्या लेखकाला पुस्तकात काय लिहिले आहे, असे विचारत नाहीत. मग चित्रपटाबाबतच का विचारणा होते, असा सवालही भांडारकर यांनी उपस्थित केला.
 
"हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक असून, फक्त ३० टक्केच वस्तुस्थितीवर आधारित आहे. अशातही विरोध होत असेल, तर ही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. माझे तोंड काळे करून किंवा अंगावर शाई फेकून तुम्ही इतिहास बदलू शकणार नाही", असं मधूर भांडारकर बोलले आहेत.