शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

इंद्राणी तुरुंगाशी घेतेय जुळवून !

By admin | Updated: October 25, 2015 01:48 IST

एके काळी आलिशान जीवन जगणाऱ्या आणि नेहमी आंतरराष्ट्रीय स्थळांना भेटी देणाऱ्या इंद्राणी मुखर्जीचे तुरुंगातील दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी भायखळा येथील

- डिप्पी वांकाणी,  मुंबईएके काळी आलिशान जीवन जगणाऱ्या आणि नेहमी आंतरराष्ट्रीय स्थळांना भेटी देणाऱ्या इंद्राणी मुखर्जीचे तुरुंगातील दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी भायखळा येथील कारागृहात समुपदेशन चालू असून, त्याला ती सहकार्य करीत आहे.अन्य महिला कैद्यांप्रमाणे तीसुद्धा हिरवी साडी परिधान करीत आहे आणि अन्य कैद्यांप्रमाणे कारागृहातील किरकोळ कामे करताना दिसत आहे. समुपदेशन आणि अन्य सर्वच बाबतीत ती सहकार्य करीत आहे. त्याचबरोबर निद्रानाशाच्या आणि चकरा येण्याच्या तिच्या तक्रारी आता कमी झाल्याचे कारागृह सूत्रांनी सांगितले.२ आॅक्टोबर रोजी इंद्राणी मुखर्जी खाली कोसळली होती आणि १५ तास बेशुद्धावस्थेत होती. तिच्या शरीरात अचानक काही भागांना रक्तपुरवठा कमी होत होता. त्यामुळे त्या क्रॉनिक इसामिया या विकारासाठीची आणि व्हिटॅमिन्सची औषधी तिला दिली जात आहेत. एका ज्येष्ठ कारागृह अधिकाऱ्याने सांगितले की, अन्य महिला कैद्यांप्रमाणे इंद्राणीही हिरवी साडी परिधान करीत असून, स्वत:ची कामे स्वत: करताना ती कपडेही धूत आहे. आम्ही तिचे समुपदेशन सुरू केले असून, त्याला ती चांगले सहकार्य करीत आहे.यापूर्वी इंद्राणीला ५ आणि ६ क्रमांकाच्या बराकीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी तिच्यासोबत अन्य ४० महिला कैदीही होत्या, पण आता तिला दुसरीकडे हलविण्यात आले असून, महिला कैद्यांची संख्याही कमी आहे. तिच्यावर कारागृह कर्मचाऱ्यांची आता सतत निगराणी आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.यापूर्वी इंद्राणीने निद्रानाश आणि मानसिक तणावाची तक्रार केल्यानंतर तिला त्या विकारावर दिली जाणारी औषधी जे. जे. इस्पितळातील व्हिजिटिंग डॉक्टरांनी दिली होती. कारागृहात डांबल्यानंतर लगेचच तिने निद्रानाश आणि चकरा येत असल्याची तक्रार केली होती. आता मात्र तिची निद्रानाश किंवा चकरा येण्याची तक्रार बंद झाली आहे. आता ती मोठ्या प्रमाणावर धार्मिक पुस्तकांचे वाचन करीत आहे. कारागृहात राहण्याची मानसिक स्थिती तयार करून आपला वेळ घालवीत आहे, असे एका सूत्राने सांगितले.सुकामेवा व फळांची खरेदीइंद्राणीने पीटर मुखर्जीला चार पत्रे लिहिली असून, पीटरने मात्र तिला केवळ दोन पत्रांचे उत्तर दिले आहे. या पत्रातील मजकूर खासगी स्वरूपाचा असून, या पत्रात कारागृहातील सुरक्षेबाबत किंवा आक्षेपार्ह माहिती आहे किंवा काय, याची तपासणी कारागृह कर्मचाऱ्यांनी केली, असे एका सूत्राने सांगितले. या कारागृहातील कैदी महिन्याला दोन हजार रुपये खर्च करून कॅन्टीनमधील उपलब्ध वस्तू खरेदी करू शकतो. इंद्राणी या रकमेचा वापर मिनरल वॉटर, फळे आणि सुकामेवा खरेदीसाठी करीत असल्याची माहिती या सूत्रांनी दिली.