शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

इंद्राणी मुखर्जीने दाखल केला जामीन अर्ज

By admin | Updated: February 6, 2016 03:32 IST

शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने प्रकृती खालावत असल्याची सबब पुढे करत विशेष सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने प्रकृती खालावत असल्याची सबब पुढे करत विशेष सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी एका आठवड्याने ठेवली आहे. गेल्या चार महिन्यांत १८ किलो वजन कमी झाले असल्याचे इंद्राणीने १७ पानी जामीन अर्जात म्हटले आहे. तिच्या म्हणण्याला दुजोरा मिळण्यासाठी तिने ५० पानी वैद्यकीय अहवाल जोडला आहे.इंद्राणीला ‘कॉर्निक स्मॉल व्हेसल्स इनकेमिक चेंजस’चा त्रास असल्यामुळे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. यामुळे तिच्या जिवाला धोका आहे, असे इंद्राणीची वकील गुंजन मंगला यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे.कधीकधी इंद्राणीला काहीच कळेनासे होते. तिची प्रकृती अत्यंत खालवल्याने तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि तणावमुक्त वातावरणात ठेवण्याची आवश्यकता आहे. भायखळा जेलमधून रुग्णालयात पोहोचण्यासाठी ४५ ते ६० मिनिटे लागतात. गेल्या वेळी जेव्हा इंद्राणी पहाटे ५ वाजता बेशुद्ध पडली होती, तेव्हा सकाळी ११ वा. ४५ मिनिटांनी डॉक्टर आले आणि रुग्णालयात हलवण्यासाठी त्यानंतर आणखी एक तास घेण्यात आला, असे इंद्राणीच्या जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.केवळ वैद्यकीय कारण पुढे करूनच इंद्राणीने जामिनावर सुटका करण्याची मागणी न्यायालयापुढे केली आहे. या हत्याप्रकरणात केवळ श्यामवर राय यानेच जामिनासाठी अर्ज केलेला नाही. (प्रतिनिधी)