शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

इंद्राणीला एका दिवसाचा जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 03:51 IST

वडिलांचे श्राद्ध घालण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला एक दिवसाचा जामीन मंजूर

मुंबई : वडिलांचे श्राद्ध घालण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला एक दिवसाचा जामीन मंजूर केला. मात्र या वेळी तिला कडेकोट पोलीस बंदोबस्तात नेण्यात येणार आहे.इंद्राणीला गुवाहटीला न नेता मुंबईतच वडिलांचे श्राद्ध घालण्याची परवानगी गुरुवारी विशेष न्यायालयाने दिली. तिला चोख पोलीस बंदोबस्तात नेण्यात यावे व यादरम्यान तिला प्रसारमाध्यमांशी बोलू देऊ नये, असा आदेश विशेष न्यायालयाने पोलिसांना दिला.वडिलांचे श्राद्ध घालण्याकरिता इंद्राणीला आसाममध्ये पाठवण्यास सीबीआयने विरोध केला. इंद्राणीचे वडील उपेंद्र कुमार यांचे १५ डिसेंबर रोजी निधन झाले. इंद्राणीने तिचा मुलगा मिखाईलला पाठवलेला मेल सीबीआयने न्यायालयाला दाखवला. या मेलमध्ये तिने आपल्याला गुवाहटीला येण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे.मिखाईल या खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्यानेही इंद्राणीला गुवाहटीमध्ये श्राद्धासाठी पाठवू नये, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. गेली तीन वर्षे आजोबांनी (उपेंद्र कुमार) इंद्राणीच्या आर्थिक व मानसिक पाठिंब्याशिवाय नातवांना पाहिले. गेले एक वर्ष ते अंथरुणाला खिळून होते. आता इंद्राणीला श्राद्धासाठी गुवाहटीला पाठवले तर ती येथे गोंधळ घालेल. त्यामुळे तिला येथे (गुवाहटी) येण्याची परवानगी देऊ नये, असे मिखाईलने अर्जात म्हटले आहे.तर सीबीआयनेही इंद्राणीला गुवाहटीमध्ये न पाठवण्याची विनंती न्यायालयाला केली. खटला काही दिवसांतच सुरू होईल. त्यामुळे सरकारी साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी तिला कारागृहाच्या बाहेर पडायचे आहे. ती प्रवासात पळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. इंद्राणीची आई १ आॅक्टोबर रोजी वारली तर इंद्राणीने तिच्या अर्जात आई नोव्हेंबरमध्ये वारल्याचे नमूद केले आहे. यावरून ती तिच्या पालकांशी किती जवळ होती, हे सिद्ध होते. तिच्या वडिलांवर मिखाईलने अंतिम संस्कार केले आहेत. त्यामुळे तिला तिथे जाण्याची आवश्यकता नाही. त्यावर तिच्या वकिलांनी इंद्राणीला किमान हरिद्वार, नाशिक किंवा मुंबई येथे श्राद्ध घालण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करत तिला एक दिवसाचा जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी)