शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणी-शीनाचे डीएनए जुळले

By admin | Updated: September 8, 2015 05:43 IST

पेणच्या गागोदे खिंडीत आरोपींनी जाळलेला व नंतर स्थानिक पोलिसांनी पुरलेला मृतदेह शीना बोराचाच होता, हे स्पष्ट करणारा आणखी एक पुरावा खार पोलिसांच्या हाती लागला आहे.

मुंबई : पेणच्या गागोदे खिंडीत आरोपींनी जाळलेला व नंतर स्थानिक पोलिसांनी पुरलेला मृतदेह शीना बोराचाच होता, हे स्पष्ट करणारा आणखी एक पुरावा खार पोलिसांच्या हाती लागला आहे. कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीनुसार गागोदे खिंडीतून मुंबई पोलिसांनी हस्तगत केलेल्या हाडांचे डीएनए मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीशी जुळले आहेत. यावरून इंद्राणी ही शीनाची बहिण नसून आई होती ही महत्वाची बाब स्पष्ट झाल्याचे पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी सोमवारी रात्री सांगितले.गागोदे खिंड येथे जाऊन खार पोलिसांनी शीनाचा मृतदेह पुरलेल्या जागी खोदकाम करून कवटी, हाडे असे अवेशष हस्तगत केले होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत या अवशेषांचा डीएनए काढण्यात आला. तो इंद्राणीच्या रक्तातील डीएनएशी जुळवून पाहिला गेला. या चाचणीत दोन्ही नमुने जुळल्याचा प्राथमिक अहवाल प्रयोगशाळेने पोलिसांना दिला आहे. यानंतर प्रयोगशाळेत सिद्धार्थ व शीना यांचे डीएनए नुमने जुळवून पाहिले जाणार आहेत.डीएनए चाचणीचा अहवाल हा दुसरा भक्कम आमच्या हाती लागला आहे. शीनाची हत्या झाली तर मृतदेह कुठे आहे हा न्यायालयाकडून किंवा आरोपींच्या वकिलांकडून खटल्यादरम्यान पोलिसांना विचारला जाणारा पहिला प्रश्न होता. मृतदेह न सापडल्याने खटल्यात पोलिसांची बाजू कमकुवत पडते की काय अशी चर्चा होती. मात्र डीएनए चाचणीवरून गागोदे खिंडीत जाळलेला, पुरलेला मृतदेह शीनाचाच होता हे स्पष्ट झाले आहे. हा डीएनए अहवाल आता आरोपींविरोधातला भक्कम पुरावा ठरू शकेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. शीना आपली बहिण असल्याचा अभास इंद्राणीने उभा केला होता. डीएनए चाचणीवरून ती तिची मुलगी असल्याचे स्पष्ट झाले आहे.याआधी मुंबई पोलिसांनी गागोदे खिंडीतून हस्तगत केलेल्या कवटी व चेहेऱ्याच्या अन्य हाडे जुळवून त्यावर नायर रूग्णालयात डीजीटल फेशिअल सुपर इम्पोझिशन चाचणी करण्यात आली. या चाचणीतून समोर आलेला चेहेरा हा शीनाच्या छायाचित्राशी जुळला होता.पीटर मुखर्जीही आरोपी ?पीटर मुखर्जी अद्यापही चौकशी सुरु असून हत्याकांडामध्ये त्याचा सहभागी असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यालाही अटक होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.