शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

...तर अप्रत्यक्ष भार ग्राहकांवरच

By admin | Updated: April 3, 2017 01:17 IST

वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर इतर सर्व कर संपुष्टात येतील.

पुणे : वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर इतर सर्व कर संपुष्टात येतील. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना जो फायदा होईल, तो ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याबाबत कायद्यामध्ये तरतूद आहे. मात्र, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे कठीण असल्याने ही तरतूद दिखाऊ स्वरूपाची वाटते. तसेच जीएसटीमुळे तोटा झालेल्या राज्यांना केंद्र सरकार पाच वर्षे परतावा देणार आहे. मात्र, त्याची वसुली अप्रत्यक्षपणे ग्राहकांकडूनच होऊ शकते, असे मत ज्येष्ठ कर सल्लागार अ‍ॅड. गोविंदराव पटवर्धन यांनी रविवारी व्यक्त केले.सजग नागरिक मंचच्या वतीने आयोजित ‘जीएसटी आणि ग्राहक’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, निमंत्रक जुगल राठी आदी उपस्थित होते. अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले, ‘‘सध्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कर आहेत. प्रत्यक्ष कर तर भरावेच लागतात. पण विविध अप्रत्यक्ष करही ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केले जातात. लोकांना कर कसे वसूल केले जातात याची जाणीव नाही. त्यामुळे वाढीव किमतीची वस्तू ग्राहकांना खरेदी करावी लागते. जीएसटीमुळे हे सर्व कर रद्द होतील. केंद्राने त्यासाठी चार कायदे केले आहेत. कॉम्पेन्सेशन सेस जीएसटी हा एक कायदा आहे. यामध्ये राज्यांना नुकसानभरपाई करताना वस्तूंवर सेस लावून ग्राहकांकडून वसुली केली जाणार आहे.’’जीएसटीमुळे अधिक कर असलेल्या वस्तूंचे कर कमी होण्याची तर कर नसलेल्या वस्तूंचे कर वाढण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत व्यापाऱ्यांना जो अतिरिक्त फायदा होईल, तो त्यांनी वस्तूंच्या किमती कमी करून ग्राहकांपर्यंत पोहोचविणे अपेक्षित आहे. कायद्यातील या तरतुदीची अंमलबजावणी खूप अवघड आहे. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना होणारच नाही. वस्तूंवरील ‘एमआरपी’तूनही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. ती रद्द करणे आवश्यक आहे. सर्व राज्यांत सारखीच करप्रणाली होणार असल्याने काही वस्तूंचे भाव वाढतील, काही वस्तूंचे कमी होतील. जीएसटी कर दर ठरविताना ते साधारणपणे सध्याच्या वस्तूच्या किमतीएवढेच असतील, असे दिसते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे अ‍ॅड. पटवर्धन यांनी नमूद केले.