शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंदिराजी, राजीव गांधींच्या बदनामीचे तीव्र पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:50 IST

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात अवमानकारक मजकूर असल्याच्या मुद्यावरून आज विधानसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी एकच गदारोळ केला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात अवमानकारक मजकूर असल्याच्या मुद्यावरून आज विधानसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी एकच गदारोळ केला. हा मजकूर तातडीने काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली; पण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नंतर केलेल्या निवेदनात तसे कोणतेही आश्वासन दिले नाही.प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हा मुद्दा उचलला. त्यांनी तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी या विषयावर जनतेत संतप्त प्रतिक्रिया असल्याचे नमूद केले.थोर नेत्यांची बदनामी करण्याचा सरकारचा अजेंडा आहे का? असा सवाल विखे यांनी केला. त्यावर, अशी मानहानी करण्याची सरकारची भूमिका नसल्याचे स्पष्ट करीत याविषयी शिक्षणमंत्री सभागृहात निवेदन करतील. आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याविषयी पाठ्यपुस्तक मंडळाला कळविले जाईल, असे सांसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. त्याने समाधान न झालेले विरोधी पक्षांचे सदस्य गोंधळ घालू लागले. गदारोळात अध्यक्षांनी कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर आरोप केले आणि त्यावरून गोंधळाला सुरुवात झाली.विनोद तावडे यांनी यासंबंधी निवेदन करताना सांगितले की, इयत्ता नववीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यपूर्व काळाबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या सन २००० पर्यंतच्या ठळक घटनांचाही समावेश करण्यात आला आहे. या काळात विविध प्रधानमंत्र्यांच्या कार्यकाळातील निर्णय आणि घटनांचाही समावेश आहे. त्या अनुषंगाने तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या काळातील घटनांच्या उल्लेखाच्या अनुषंगाने बोफोर्स प्रकरणामुळे सरकार गेल्याचे म्हटले आहे. हा इतिहास सन २००० सालापर्यंतचाच असल्याने आणि राजीव गांधी यांच्या निर्दोषत्वावर त्यानंतर निर्णय झाल्याने त्याबाबत अभ्यासक्रमात उल्लेख आलेला नाही.यास्तव अशा घटनांमुळे कोणाचीही बदनामी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येतील, असे तावडे म्हणाले.