शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘डी गँग’चे भारताला खुले आव्हान

By admin | Updated: July 5, 2015 03:07 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधून त्याला भारतात परत आणू, अशी घोषणा केंद्र सरकारकडून वारंवार होत असतानाच दाऊदचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकीलने

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधून त्याला भारतात परत आणू, अशी घोषणा केंद्र सरकारकडून वारंवार होत असतानाच दाऊदचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकीलने डॉनला पकडून दाखवाच, असे आव्हान सरकारला दिले आहे. त्याचवेळी ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी दाऊदचा आत्मसमर्पणाचा प्रस्ताव आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नकाराबाबत केलेल्या दाव्यांमुळे याची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. देशात नवे सरकार आले की दाऊदला पकडण्याच्या गर्जना सुरू होतात. त्याला पकडू, घुसून आणू अशा वल्गना केल्या जातात. तो काय हलवा आहे काय? त्याला बकरीचे पिलू समजलात काय, असा सवाल उपस्थित करून शकीलने सरकारची एक प्रकारे खिल्लीच उडविली आहे. तुम्हाला पकडायचेच असेल तर छोटा राजनला पकडा. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी राजनला कितीही मदत केली तरी आम्ही त्याला हुडकून ठार मारूच, अशी धमकीही शकीलने दिली आहे. शकीलने इंग्रजी वृत्तपत्र प्रतिनिधीला कराचीतून दूरध्वनीवर मुलाखत दिली. तो म्हणतो, १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर देशात परतायचे होते. परंतु त्या वेळी सरकारने आमचा प्रस्ताव फेटाळला. दाऊदचे राम जेठमलानी यांच्यासोबत बोलणेही झाले होते. पण गृह मंत्रालय आणि लालकृष्ण अडवाणी यांनी आडकाठी आणली. जेठमलानी यांनीही याला दुजोरा दिला आहे. शरण आल्यानंतर आमचा छळ होऊ नये, तसेच खटला सुरू असताना आम्हाला आमच्या घरातच नजरकैदेत ठेवले जावे, अशी अट त्याने घातली होती. मात्र त्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार असे कुठलेही आश्वासन देण्यास तयार नव्हते, असे जेठमलानी यांनी स्पष्ट केले. दाऊदने ठेवलेली अट स्वीकारणे अशक्य होते...दाऊद इब्राहिम हा भारतात परत येण्यास उत्सुक होता व तसा प्रस्ताव त्याने ख्यातनाम विधिज्ञ राम जेठमलानी यांच्यामार्फत दिला होता. मात्र दाऊदचा प्रस्ताव हा अटीसापेक्ष होता. दाऊद भारतात आला तर त्याला तुरुंगात न ठेवता घरी राहण्याची मुभा द्यावी, अशी त्याची अट होती. ही अट स्वीकारणे अशक्य होते. दाऊद भारतात आला तर त्याला कायद्याच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल असे आपण जेठमलानी यांना स्पष्ट केले होते.- शरद पवार, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र