शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वायुप्रदूषणामुळे अडीच वर्षांनी घटले भारतीयांचे आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 05:42 IST

संडे अँकर । अहवालाद्वारे उघड; श्वसनाशी निगडित विकारांमध्ये झाली वाढ

- स्नेहा मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिवसागणिक वायुप्रदूषणाचे वाढते प्रमाण ही जागतिक समस्या बनली आहे. गेल्या काही वर्षांत सर्व वयोगटातील नागरिकांना या वायुप्रदूषणाचे दूरगामी परिणाम सहन करावे लागत आहेत. परिणामी, सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हार्मेंट या संस्थेच्या अहवालानुसार, वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे भारतीयांचे आयुष्य दोन वर्षे सहा महिन्यांनी घटले असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. देशातील वायुप्रदूषण हे आरोग्यविषयक आजारांमधील तिसरे अतिजोखमीचे कारण बनले आहे.

या अहवालानुसार, घरातील प्रदूषण आणि वातावरणातील प्रदूषण यांमुळे श्वसनाशी निगडित विकारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. धूम्रपानानंतर वायुप्रदूषणामुळे आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम हे मृत्यूमागील मुख्य कारण आहे. जागतिक पातळीवर आयुर्मान घटण्याच्या प्रमाणाशी तुलना करता देशातील प्रमाण अधिक असल्याचे चिंताजनक निरीक्षण अहवालात नोंदविले आहे. बाह्य वातावरणातील प्रदूषणामुळे एक वर्ष आणि सहा महिन्यांनी आयुष्य घटते, तर घरातील प्रदूषणामुळे एक वर्ष, दोन महिन्यांनी आयुष्य घटल्याची नोंद अहवालात आहे. घरातील प्रदूषणाचे बाह्य प्रदूषणापेक्षा तिपटीने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम दिसून येतात.

वायुप्रदूषणामुळे होणाºया श्वसनविकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यात ४९ टक्के नागरिकांना दीर्घकालीन फुप्फुसांचे आजार झालेले दिसून येतात. तर ३३ टक्के व्यक्तींचा मृत्यू फुप्फुसाच्या कर्करोगाने होत आहे. याखेरीज, मधुमेह व हृदयविकारांचे प्रमाण १५ टक्के असल्याचे आढळले आहे. त्याचप्रमाणे, श्वसनाच्या विकारांचे प्रमाण अगदी कमी वयातच दिसून येत असल्याची गंभीर बाब या अहवालात नमूद आहे. श्वसनाद्वारे सूक्ष्म अल्ट्रा कण शरीरात जातात, ते कण पेशी, रक्तप्रवाहातही पसरतात. वायुप्रदूषणातील विषारी वायूमुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना दीर्घकालीन शारीरिक आणि मानसिक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे.दहा वर्षांत चारपट वाढघरात आणि बाहेर होणाºया वायुप्रदूषणामुळे होणाºया मृत्यूंच्या प्रमाणात दहा वर्षांत चार पट वाढ.जगातल्या दर आठ मृत्यूंमध्ये एक मृत्यू वायुप्रदूषणामुळे होत आहे.भारत आणि चीनमध्ये जगात वायुप्रदूषणाचे सर्वाधिक बळी गेल्याचे उघड.
प्रतिबंधात्मक उपाय गरजेचेवायुप्रदूषणामुळे श्वसनाच्या विकारांत वाढ झाली आहे. याची प्राथमिक लक्षणे अ‍ॅलर्जीच्या माध्यमातून दिसतात; आणि नंतर त्याचे रूपांतर दीर्घकालीन आजारांत होते. अशा स्थितीत वेळीच लक्षणे ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. कानात बुरशी होणे, लहान वयात श्वसनास त्रास होणे, नाकाच्या आत सूज येणे, डोळ्यांत जळजळ होणे, ब्रॉन्कायटीस अशा लहान लक्षणांपासून आजारांची सुरुवात होते. अशा वेळी वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार घ्यावा. योगासने, प्राणायाम करावा.- डॉ. श्रीनिवास चव्हाण, प्रा. व विभागप्रमुख, कान-नाक-घसा, जे. जे. रुग्णालय