शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

भारताचे ५ खेळाडू उपांत्य फेरीत

By admin | Updated: June 2, 2017 02:49 IST

भारताचे सिद्धांत बांठिया, महक जैन, मेघ भार्गव पटेल, नितीन कुमार सिन्हा, मिहिका यादव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारताचे सिद्धांत बांठिया, महक जैन, मेघ भार्गव पटेल, नितीन कुमार सिन्हा, मिहिका यादव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून, १८ वर्षांखालील आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलतील एमएसएलटीए स्कूल आॅफ टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या जागतिक क्र.२९४ असलेल्या नितीन कुमार सिन्हा याने जागतिक क्रमवारीत १२९ असलेल्या जपानच्या तैसेई इचिकावाचा ४-६, ६-२, ७-६(७) असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. जागतिक क्र.१९६ असलेल्या मलेशियाच्या चीन क्रिस्टियन्स दिदिअरने जागतिक क्र.१५० असलेल्या भारताच्या ध्रुव सुनीशचे आव्हान ७-६(२), ६-४ असे मोडीत काढले. अव्वल मानांकित व भारताच्या सिद्धांत बांठिया याने आपली विजयी मालिका कायम ठेवत तैपेईच्या हो रे याचा ३-६, ६-३, ६-१ असा तीन सेटमध्ये पराभव केला. काल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या जागतिक क्र.५१६ असलेल्या भारताच्या मेघ भार्गव पटेल याने दिग्विजय सिंगचा ६-४, ६-४ असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. मुलींच्या गटात अव्वल मानांकित व भारताच्या महक जैन हिने सालसा आहेरवर ६-२, ६-२ असा विजय मिळवत आगेकूच केली. भारताच्या व दुसऱ्या मानांकित मिहिका यादवने जपानच्या फुना कोझाकीचे आव्हान ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले. तैपेईच्या व चौथ्या मानांकित ली कुआन यी हिने सातव्या मानांकित व भारताच्या वैदेही चौधरीचा ६-४, ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव केला. दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सिद्धांत बांठियाने जपानच्या जेम्स ट्रॉटरच्या साथीत तैपेईच्या हो रे व चीनच्या मुताओचा ६-४, ७-६(३) असा पराभव केला. दिग्विजय सिंग व नितीन कुमार सिन्हा या भारतीय जोडीने परीक्षित सोमाणी व ध्रुव सुनीशला ७-६(२), ६-२ गुणांनी नमविले. स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुले: सिद्धांत बांठिया (भारत,१) वि.वि.हो रे (तैपेई) ३-६, ६-३, ६-१; मेघ भार्गव पटेल (भारत) वि.वि.दिग्विजय सिंग (भारत) ६-४, ६-४; चीन क्रिस्टियन्स दिदिअर (मलेशिया) वि.वि.ध्रुव सुनीश (भारत,७) ७-६(२), ६-४; नितीन कुमार सिन्हा (भारत) वि.वि.तैसेई इचिकावा (जपान,३) ४-६, ६-२, ७-६(७); मुली: महक जैन (भारत,१) वि.वि.सालसा आहेर (भारत) ६-२, ६-२; ली कुआन यी (तैपेई,४) वि.वि. वैदेही चौधरी (भारत,७) ६-४, ६-४; माई नपात निरुद्रोण (थायलंड,५) वि.वि. मना कवामुरा (जपान) ६-१, १-६, ७-५; मिहिका यादव (भारत,२) वि.वि.फुना कोझाकी (जपान) ६-१, ६-२. दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुले: सिद्धांत बांठिया (भारत) /जेम्स ट्रॉटर (जपान)वि.वि. हो रे(तैपेई)/मु ताओ (चीन)६-४, ७-६(३) दिग्विजय सिंग (भारत) /नितीन कुमार सिन्हा (भारत) वि.वि. परीक्षित सोमाणी (भारत) /ध्रुव सुनीश (भारत) ७-६(२), ६-२ ओटीको (फिलिपिन्स) /सेइता वात्नाबी(जपान) वि.वि.मृत्युंजय बडोला (भारत)/ रिषभ शारदा(भारत) ६-२, ६-४ हो डेंटन (हाँग काँग)/ लॅम चिंग (हाँग काँग) वि.वि तैसेई इचिकावा (जपान)/ रियुकी मत्सुदा(जपान) ६-२, ७-५