शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तरुणाची १४ महिन्यांच्या ‘वनवासा’नंतर सुटका

By admin | Updated: September 29, 2016 06:23 IST

सोशल मीडियाच्या गैरवापराच्या घटना वाढत असल्या तरी त्याचा विधायक वापरही होऊ शकतो, याचा प्रत्यय कर्नाटकातील अकबर बादशहा या तरुणाबाबत घडलेल्या घटनेतून आला आहे

- जमीर काझी, मुंबई

सोशल मीडियाच्या गैरवापराच्या घटना वाढत असल्या तरी त्याचा विधायक वापरही होऊ शकतो, याचा प्रत्यय कर्नाटकातील अकबर बादशहा या तरुणाबाबत घडलेल्या घटनेतून आला आहे. नोकरीच्या निमित्ताने सौदी अरेबियात गेल्या १४ महिन्यांपासून मालकाकडून फसवणूक झालेल्या या तरुणाला लवकरच भारतीय दूतावासाकडून स्वदेशात पाठविले जाणार आहे. आपल्यावरील अन्यायाचे मोबाइलवर शूटिंग करून सोशल मीडियावरून व्हायरल केलेल्या व्हिडीओने त्याचा भारतातील परतीचा मार्ग निश्चित केला आहे. आपली फसवणूक आणि भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची कैफियत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी व्हिडीओ क्लिप शेअर करण्याचे आवाहन त्याने केले होते. त्याची ही क्लिप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व सौदीतील भारतीय राजदूत अहमद जावेद यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर युद्धपातळीवर त्याचा शोध घेण्यात आला. प्रस्तुत प्रतिनिधीने ती क्लिप जावेद यांना ‘व्हाट्सअ‍ॅप’वर पाठविली होती. त्याची दखल घेत त्यांनी पुढील कार्यवाही केली. कर्नाटकातील सागर शहरातील अकबर बादशहा गेल्या वर्षी जुलैमध्ये सौदीतील नजरान शहरात घरकामासाठी गेला होता. - पगाराबाबत मालक टोलवाटोलवी करीत असे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अकबरने भारतात परत जाण्यासाठी पासपोर्टची मागणी केली. त्यावर त्याला ५ हजार रियाल दिले तरच परत जाता येईल, असे सांगून धमकावले. त्याला घरात डांबून त्याची उपासमार करू लागला. - अखेर अकबरने एका मित्राच्या साहाय्याने आपल्यावरील अन्यायाची मोबाइलवर व्हिडीओ क्लिप बनवून गावाकडील एका मित्राला मोबाइलवर पाठविली. ती क्लिप सौदीतील राजदूत अहमद जावेद यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्याची दखल घेत अधिकाऱ्यांना अकबरचा शोध घेण्याची सूचना केली. त्यानंतर नजरान येथे त्याची भेट घेत अधिकाऱ्यांनी संबंधिताकडून त्याचे पासपोर्ट व अन्य पेपर घेतले. - गेल्या आठवड्यात अकबरने कशीबशी सुटका करून घेत जेद्दाह येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांची भेट घेत आपला पासपोर्ट मिळवून देण्याची विनंती केली. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी रकमेची मागणी केली. अकबरने नकार देत पैसे नसल्याने दोन दिवसांपासून उपाशी असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी ‘या कामात तुझी काहीही मदत करू शकत नाही, तू परत मालकाकडे जा, मुदत संपल्यानंतर भारतात पाठविले जाईल, तुझे काम करण्यास आम्ही बांधील नाही’, असे दरडावत हुसकावून लावले. अकबरचा शोध घेऊन तो काम करीत असलेल्या संबंधिताकडून त्याचे पासपोर्ट व अन्य महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहेत. कराराप्रमाणे त्याचे थकीत वेतन मिळवून देण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने उद्या गुरूवारी त्याला सौदीतून बंगळूरू येथे पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित मालकावर कार्यवाही केली जाणार आहे. - अहमद जावेद (सौदी अरेबियातील भारतीय राजदूत)