शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळमुक्तीसाठी सरसावली भारतीय जैन संघटना

By admin | Updated: May 16, 2017 02:21 IST

भारतीय जैन संघटनेने आता राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी गावेच्या गावे पिंजून काढायला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय जैन संघटनेने आता राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी गावेच्या गावे पिंजून काढायला सुरुवात केली आहे. संघटनेचे कार्यकर्ते १३ जिल्ह्यांमधील ३० तालुक्यांत गावकऱ्यांच्या मदतीने थेट श्रमदानात सहभागी झाले आहेत.अभिनेता अमीर खान यांनी ‘पानी फाउंडेशन’च्या माध्यमातून गतवर्षीपासून गावपातळीवर वॉटरकप स्पर्धा राबविण्यास सुरुवात केली आहे. या स्पर्धेंतर्गत ६६७ गावांतील नागरिक यंदाच्या पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी त्यांच्या शिवारात मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात श्रमदान करीत आहेत. या श्रमदानाला अधिक बळ मिळावे, यासाठी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथ्था, राज्य समितीचे सुदर्शन जैन यांनी २८५ जेसीबी, पोकलँड मशिन देऊन भरीव सहकार्य केले आहे. गावपातळीवर सुरू झालेल्या श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांनी वेग घेतला आहे. गावकऱ्यांनी मागणी केल्यास अधिक यंत्र उपलब्ध करून दिले जातील, असे शांतीलाल मुथ्था यांनी सांगितल्याने, गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट दूर करणे केवळ शासनाचे कर्तव्य नसून, सामाजिक दायित्व म्हणून जैन संघटना पुढे सरसावल्याचे शांतीलाल मुथ्था यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राज्यात एकाच वेळी २८५ जेसीबी, पोकलँडद्वारे जलसंधारणाची कामे होत आहेत. यात गावकऱ्यांचे श्रमदान लाखमोलाचे ठरत आहे. सामूहिक प्रयत्नाने नक्कीच राज्य दुष्काळमुक्त होईल.- सुदर्शन जैन, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जैन संघटना