शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जैन संघटनेचे अधिवेशन उद्या बाहुबलीत

By admin | Updated: January 9, 2016 00:54 IST

देशभरातून सात हजार कार्यकर्ते येणार

बाहुबली : भारतीय जैन संघटनेचे ११वे द्वैवार्षिक अधिवेशन उद्या, रविवारी (दि. १0) बाहुबली (कुंभोजगिरी, ता. हातकणंगले) येथे होणार आहे. संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबतच राज्यभरातून पाच ते सात हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष पारस ओसवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा आणि सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.ओसवाल म्हणाले, महाराष्ट्रातून सुरू झालेले जैन संघटनेचे काम सध्या अनेक राज्यांमध्ये विस्तारलेले आहे. केवळ जैनच नाही, तर सर्वच समाजातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. लातूर, गुजरातमधील भूज, उत्तराखंड व जम्मू-काश्मीरमध्ये भूकंप पीडितांना मदत असो अथवा नैसर्गिक आपत्ती सर्वच ठिकाणी संघटनेने भरीव मदत केली आहे. बाहुबली येथे होणाऱ्या अधिवेशनात पुढील दोन वर्षांमध्ये संघटनेच्या वतीने करण्यात येणारे सामाजिक काम, शेतकरी व शेतीसाठीचे प्रयत्न त्याचबरोबर जैन समाजासमोरील अडचणींवर चर्चा केली जाणार आहे. व्यवसायाच्या निमित्ताने जैन समाज देशभरात विखुरलेला आहे. त्यांना एकत्र करणे व समाजासाठी विधायक कार्य करण्याचे यशस्वी प्रयत्न करीत आहे. या अधिवेशनामध्ये अल्पसंख्यांक जैन समाजाला भेडसावणारे प्रश्न याबाबतही विचारमंथन होणार आहे. या राज्य अधिवेशनात नवीन वर्षासाठी राज्य अध्यक्षांची घोषणा होणार आहे. अधिवेशनाला जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पारस ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी अभिनंदन खोत, प्रकाश मुंगळी, ऋषभ छाजेड, सुरेश मगदूम, शैला पाटील व डॉ. शीतल पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)तयारी पूर्णअधिवेशनासाठी बाहुबली येथे साधारण वीस ते पंचवीस हजार श्रावक बसतील इतका मंडप उभा करण्यात आलेला आहे. बाजूलाच पार्किंगसाठी मोकळी जागा आहे. बाहुबलीसह पन्हाळा, शिरोली, कोल्हापूर येथील जैन मंदिरात कार्यकर्त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून आहे. अधिवेशनासाठी विविध विभाग करण्यात आले असून त्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.