सोलापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात हजारो वर्षांपासून अन्याय, अत्याचाराच्या खाईत लोटलेल्या दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, माणसाला माणूसपण देऊन समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही राज्यनिर्मितीवर भर दिला. जगात आदर्श ठरलेली भारतीय राज्यघटना म्हणजेच खरा आंबेडकरवाद आहे, असे प्रतिपादन १३ व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विचारवंत ज. वि. पवार यांनी शनिवारी व्यक्त केले. हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. विचारपीठावर आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, महापौर प्रा. सुशीला आबुटे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ज्यांनी विचारांना कृतीची आणि संघर्षाला लढ्याची जोड दिली त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी साहित्याचा विचार होणे आवश्यक आहे. आंबेडकरवाद म्हणजे वर्चस्ववादाविरुद्धचा लढा. (प्रतिनिधी)
भारतीय राज्यघटना म्हणजे खरा आंबेडकरवाद’
By admin | Updated: February 15, 2015 00:45 IST