शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नव्वदीत मिळाले भारतीय नागरिकत्व

By admin | Updated: April 23, 2016 02:13 IST

स्पेनमधील बार्सिलोना येथे १९२६ मध्ये जन्म झालेले आणि गेली ६0 वर्षे आपल्या समाजकार्याच्या निमित्ताने भारत हीच आपली कर्मभूमी मानणारे ख्रिश्चन धर्मगुरू फेडरिको सोपेना गुसी यांना

जयंत धुळप,  अलिबागस्पेनमधील बार्सिलोना येथे १९२६ मध्ये जन्म झालेले आणि गेली ६0 वर्षे आपल्या समाजकार्याच्या निमित्ताने भारत हीच आपली कर्मभूमी मानणारे ख्रिश्चन धर्मगुरू फेडरिको सोपेना गुसी यांना त्यांच्या इच्छेनुसार अखेर ९० व्या वर्षी गेल्या पाच वर्षांच्या पाठपुराव्याअंती ‘भारतीय नागरिकत्व’ गुरुवारी प्राप्त झाले. गुरुवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांच्यासमोर भारतीयत्वाची शपथ त्यांना देण्यात आली. शपथविधीनंतर त्यांना भारतीयत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करताच ते सुखावून गेल्याचे त्यांच्या या भारतीयत्वाच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.१९४९ मध्ये आपल्या समाजकार्याच्या हेतूने भारतात आलेले सोपेना ख्रिश्चन आहेत. गेली अनेक वर्षे रायगडमधील कातकरी-आदिवासी या मागास समाजाकरिता काम करीत असलेले सोपेना या आदिवासीच्या वाडीवस्तीवर ‘सोपेना बाबा’ म्हणून ओळखले जातात. हिंदी व मराठी भाषा अस्खलित बोलणाऱ्या सोपेना यांचा धर्मनिरपेक्षता तत्त्वावर ठाम विश्वास आहे आणि त्यामुळेच ते सर्वधर्मीयांमध्ये पोहोचू शकले. चारधामा यात्रा करून त्यांनी हिंदू संस्कृतीचा अभ्यास केला तर ‘भारतमाता की जय’ हे त्यांनी आपल्या आयुष्याचेच ब्रीद करुन टाकले.तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, भाषा आणि विविध धर्मांचा अभ्यास असलेल्या सोपेना यांनी १९७८ मध्ये भारतीयत्वासाठी प्रथम अर्ज केला होता. परंतु त्याची फारशी दखल शासन स्तरावर घेण्यात आली नाही. २0११ पर्यंत त्यांनी एकूण तीन वेळा अर्ज केला, परंतु यश आले नाही. अखेर ‘मी स्पॅनिश म्हणून जन्मलो असलो तरी मरणार मात्र भारतीय म्हणूनच’ अशा धेयाने प्रेरित झालेल्या सोपेना यांची भेट आदिवासी बांधवांकरिता रायगडमध्ये कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांच्याशी झाली. वैशाली पाटील यांनी सोपेना यांची सर्व संबंधित कागदपत्रे, प्रमाणपत्रे संकलित केली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे आणि वैशाली पाटील यांनी दिल्लीतील भारतीय नागरिकत्व संचालनालयापर्यंत नेटाने पाठपुरावा केल्यानंतर सोपेना यांना भारताचे ‘विशेष’ नागरिकत्व बहाल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.