शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेजारील शत्रुराष्ट्रांमुळेच भारत शस्त्रसज्ज

By admin | Updated: January 10, 2015 01:25 IST

भारत हे शांतताप्रिय राष्ट्र आहे, तथापि, शेजारील काही शत्रुराष्ट्रांमुळे भारताला शस्त्रसज्ज राहावे लागत आहे.

नाशिक : भारत हे शांतताप्रिय राष्ट्र आहे, तथापि, शेजारील काही शत्रुराष्ट्रांमुळे भारताला शस्त्रसज्ज राहावे लागत आहे. त्यामुळे अशा मित्रत्व न बाळगणाऱ्या राष्ट्रांमुळेच शस्त्रांस्त्रांची गरज कायम राहणार आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.ओझरच्या हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएलच्या) कारखान्यात सुखोई या लढाऊ विमानांच्या निर्मितीचा पहिला १५० विमान निर्मितीचा टप्पा पार पडला. त्याचवेळी विशिष्ट कालावधीनंतर सुखोई विमानांची देखभाल दुरुस्तीसह पुनर्बांधणी करून ते पुन्हा हवाईदलाला सुपूर्द करण्याचा सोहळा शुक्रवारी ओझर येथे झाला. एचएएलचे अध्यक्ष डॉ. त्यागी यांनी पुनर्बांधणी केलेले दुसरे सुखोई विमान हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यासाठी सज्ज होत आहे, असे सांगितले. नाशिक, कोरापत, लखनौ, कोरवा आणि हैदराबाद यांचा सुखोईच्या निर्मिती आणि पुनर्बांधणीत सहभाग आहे. सुखोई-३० एमकेआय, एसबी०२७ तसेच नव्याने निर्मित केलेले १५० वे सुखाई ३० एमकेआय हे लढाऊ विमान संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते हवाई दलाला सुपूर्द करण्यात आले. हवाई दलप्रमुख अरूप रहा, एचएएलचे सह संचालक के. के. पंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) सुखाई विमानांच्या पुनर्बांधणीसाठी रशियाचे सहकार्य आहे. रशियाने त्यासाठीची कागदपत्रे दिली आहेत. सुखोई विमांनची देखभाल दुरूस्तीसह पुनर्बांधणी करण्यासाठी ओझर येथील कारखान्यात दहा नवीन शॉप सुरू करणे प्रस्तावित आहे, अशी माहिती एचएएलचे अध्यक्ष डॉ. त्यागी यांनी दिली.