शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
7
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
8
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
9
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
10
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
11
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
12
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
13
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
14
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
15
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
16
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
17
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
18
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
19
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
20
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

भारत झाला पोलिओमुक्त...

By admin | Updated: February 8, 2015 02:21 IST

जानेवारी २०१४ नंतर देशात पोलिओचा एकही नवा रुग्ण न आढळल्याने भारत हा ‘पोलिओमुक्त देश’ जाहीर करण्यात आला आहे;

जागतिक आरोग्य संघटनेची सूचना सचिन राऊत ल्ल अकोलाजानेवारी २०१४ नंतर देशात पोलिओचा एकही नवा रुग्ण न आढळल्याने भारत हा ‘पोलिओमुक्त देश’ जाहीर करण्यात आला आहे; मात्र पाकिस्तान व अफगाणिस्तानसह जगभरातील नऊ देशांमध्ये पोलिओचे ३५० नवीन रुग्ण आढळून आल्याने भारतावरील पोलिओचे सावट कायम आहे. त्या अनुषंगाने पल्स पोलिओ मोहीम आणखी काही वर्षे सुरूच ठेवण्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.बालवयापासूनच कायमस्वरूपी अपंगत्व लादणाऱ्या पोलिओने हमखास लसीचा शोध लागण्यापूर्वी हजारो बालकांना एकाच वेळी विळख्यात घेतले होते. पोलिओची एकदा लागण झाली की, त्यावर कोणताही उपाय नसल्याने रुग्णाला कायमचे अपंगत्व येते. या आजारावर अमेरिकेने लस शोधली. भारतात १९९४ साली सर्वप्रथम दिल्लीत आणि त्यानंतर ९ डिसेंबर १९९५ पासून संपूर्ण देशात पोलिओमुक्तीसाठी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरणाची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आणि भारतातून पोलिओ हद्दपार झाला. पण शेजारच्या देशांसह एकूण नऊ देशांमध्ये पोलिओचे ३५० रुग्ण नव्याने आढळल्याने या विषाणूंचा भारतातील धोका संपलेला नाही. यावर खबरदारी म्हणून दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीत घेण्यात येणारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आणखी काही वर्षे सुरूच ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेवरून घेतला आहे. लसीकरण हाच उपाय : बालकाला शून्य ते पाच वर्षे वयोगटात पल्स पोलिओ लसीकरण करणे आवश्यक आहे. बालकाला प्रत्येक वेळी लसीचे दोन थेंब द्यावे लागतात. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. वारंवार लसीकरण केल्याने शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे विषाणूचा संसर्ग झाला, तरी बालकाला पोलिओ होत नाही. लसीकरण बंद केल्यास पोलिओचा धोका असल्याने, ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.पोलिओचे विषाणू शरीरात असताना, विष्ठेतून ते बाहेर पडतात. त्यानंतर हे विषाणू पाण्यामध्ये मिसळल्यास, ते झपाट्याने पसरत जातात. ज्या नऊ देशांमध्ये नव्याने रुग्ण आढळले, त्या देशांमध्ये हे विषाणू पसरणे सुरू झाले असून, तेथील नागरिक भारतात आल्यास, पोलिओच्या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आणखी काही वर्षे सुरूच ठेवली जाणार आहे.- डॉ. एस. आर. ठोसरसमन्वयक, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)विषाणूचे तीन प्रकारपोलिओ हा पी-१, पी-२ आणि पी-३ अशा तीन प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. ब्रूनहाइड, लान्सिंग व लिआॅन अशी या विषाणूंची नावे असून, पोलिओ प्रसाराला कारणीभूत ठरतात.