शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ई-कॉमर्समध्ये भारताला संधी

By admin | Updated: December 14, 2015 00:25 IST

जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जात असून, देशाला ई- कॉमर्समध्ये मोठी संधी आहे.

पुणे : जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जात असून, देशाला ई- कॉमर्समध्ये मोठी संधी आहे. परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांनीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुलभ असे स्वतंत्र मॉडेल तयार केले आहे. केंद्र शासनातर्फे ई-कॉमर्सच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी रविवारी सांगितले. तसेच युवा शक्तीसह प्रत्येकाने देशाच्या विकासात विविध प्रकारे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.सिम्बायोसिस विद्यापीठाच्या १२ व्या पदवी प्रदान समारंभात सिन्हा बोलत होते. याप्रसंगी बार कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रमुख व्यसस्थापकीय संचालक डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, कुलसचिव डॉ. एस. सी. नेरकर उपस्थित होते. चीन, अमेरिकेनंतर भारत हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सांगून सिन्हा म्हणाले, भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सातत्यपूर्ण विकास, ना नफा, ना तोटा तत्त्वावरील विकासाचे मॉडेल उभारावे लागणार आहे. त्याअंतर्गत देशातील उत्पादनक्षमता, मानव संसाधनाचा पुरवठा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा सदुपयोग यासोबत ई- कॉमसर्मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून उच्चभ्रू वर्गातील नागारिकांसाठी ई-कॉमर्सची आवश्यकता आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या काटकसरी विकास मॉडेलने शाश्वत जागतिक विकासाला गती मिळू शकेल.दरम्यान, पदवी प्रदान समारंभात विधी, व्यवस्थापन, आरोग्य विज्ञान, डिझाईनिंग, अभियांत्रिकी आदी विद्याशाखांमधील एकूण ४ हजार ९८१ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पदविका प्रदान करण्यात आल्या. तसेच ३८ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी, तर ८ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी संस्थेच्या विकासाच्या वाटचालीची माहिती देऊन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. रजनी गुप्ते यांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची माहिती दिली. डॉ. विद्या येरवडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)