शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस-वेच्या घाटात लहान वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

By admin | Updated: May 10, 2017 02:52 IST

राज्यातील प्रमुख व वर्दळीचा महामार्ग असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील घाटात होणारी वाहनांची कोंडी आता काही प्रमाणात कमी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील प्रमुख व वर्दळीचा महामार्ग असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील घाटात होणारी वाहनांची कोंडी आता काही प्रमाणात कमी होणार आहे. खालापूर टोल नाका ते कुसेगाव टोल नाक्यापर्यंतच्या मार्गावरील पहिल्या लेनवरून, आता केवळ लहान वाहनेच जाऊ शकणार आहेत. या मार्गावर ठिकठिकाणी ठरावीक उंचीचे आडवे खांब यंत्रणा (हाइट बॅरियर सीस्टिम) कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यामुळे अवजड वाहनांना मज्जाव होणार आहे.राज्य महामार्ग वाहतूक सुरक्षा विभागाच्या वतीने जवळपास ९४ किलोमीटर अंतराच्या या मार्गावर, सुमारे ३१५ ठिकाणी आडवे खांब बसविण्यात येणार आहेत. त्याबाबत खालापूर टोल नाक्यावर प्रायोगिक तत्वावर त्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे, असे महामार्ग वाहतूक शाखेचे प्रमुख आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.मुंबई व पुणे या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गावर वाहनांची नेहमी ये-जा असते. मात्र, बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन दोन्ही बाजूला लांबवर रांगा लागून वाहने खोळंबून राहतात. त्यामागील प्रमुख कारण हे अवजड वाहने म्हणजे ट्रक, ट्रेलर हे मार्गावरील तीनही लेनचा वापर करतात. विशेषत: रात्रीच्या वेळी त्यांच्याकडून सर्रासपणे तीनही लेनवरून वाहने चालविली जातात. त्यामुळे लहान वाहनांना जाता येत नाही. परिणामी, वाहतूककोंडी होऊन दोन्ही बाजूंकडील वाहने खोळंबून राहतात. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील पहिली लेन ही लहान वाहनांसाठीच खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य रस्ते सुधारणा महामंडळ (एमएसआरडीसी) व आयआरबीला सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, ‘हाइट बॅरियर’ची तपासणी केली असून, लवकरच ती संपूर्ण लोणावळा घाटात बसविली जाणार आहेत. त्या खालून केवळ लहान वाहने, रुग्णवाहिका जाऊ शकतील.महिन्याला १८ हजार प्रकरणे-महामार्गावरील वाहतूक अपघात विरहित व सुरळीत राहण्यासाठी आर. के. पद्मनाभन यांनी, गेल्या पाच महिन्यांपासून गोल्डन अवर्स, इनव्हिजेबल पोलिसिंग अशा विविध उपाययोजना राबविल्या आहेत.त्यासाठी बेशिस्त वाहनांवर कारवाईचा धडाका लावला असून, दर महिन्याला सरासरी १८ हजार केसेस करण्यात येत आहेत. पूर्वी त्याचे प्रमाण महिन्याला जेमतेम ३ ते ४ हजार इतके होते.