शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी श्रीहरी अणेंनी काढला स्वतंत्र राजकीय पक्ष

By admin | Updated: September 24, 2016 15:06 IST

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी पक्षाची घोषणा केली.

ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. २४ -  स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी (विरा) या राजकीय पक्षाची शनिवारी घोषणा केली. या पक्षाची लवकरच राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात येईल. यानंतर आगामी स्थाानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 विदर्भ राज्य आघाडीतर्फे (विरा) लकडगंज येथील टिंबर भवन येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी उपरोक्त घोषणा केली.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर आपण कधीपर्यंत काँग्रेस व भाजपाच्या भरवश्यावर राहणार ? आता आपल्यालाच सत्ता मिळवून स्वतंत्र राज्य निर्माण करून घ्यावे लागले. त्यासाठी विदर्भाची नवीन लीडरशीप निर्माण करण्याची गरज आहे. ते राजकीय पक्षाचा पर्यान निर्माण केल्यानेच होईल.  लवकरच स्थानिक स्वरज्य संस्थांचा निवडणुका येत आहेत. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे. आम आदमी पार्टीने जशी चुक केली, तसे करणार नाही, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आघाडी या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करेल. परंतु सर्वच जागा लढवणार नाही. जया जागांवर शक्य आहेत. त्याच जागा लढणार. इतर विदर्भवादी राजकीय पक्षांसोबत आघाडी किंवा उमेदवार उभे करतांना तडजोड सुद्धा करता येईल, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या मोर्चासंदर्भात अ‍ॅड. अणे यांना पत्रकारंनी विचारले असता ते म्हणाले, त्यांना आरक्षण मिळायला हवे, परंतु आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हे निकष हे. तेव्हा  या निकष तपासून पाहावे व त्यांना आरक्षण द्यावे. दुसरा मुद्दा अ‍ॅट्रोसिटीचा आहे. अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा कधीकधी दुरुपयोग होतो, ही बाब खरी असली तरी एकच समाज सातत्याने जातीय अत्याचाराला बळी पडत आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.