शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी आजपासून स्वतंत्र बससेवा

By admin | Updated: July 13, 2017 01:36 IST

पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची मागणी लावून धरल्यानंतर पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. निगडी येथून पीएमपीएमएलची वातानुकूलित बस सुरू केली आहे. गुरुवारपासून निगडी येथून महिलांसाठी स्वतंत्र बस सुरू करण्यात येणार आहे.स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहराला पीएमपीएमएलमार्फत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविली जाते. त्या मोबदल्यात या दोन्ही महापालिका पीएमपीएमएलला दरवर्षी कोट्यवधींचा निधी देतात. मात्र सेवा पुरविताना पीएमपीएमएलकडून पिंपरी-चिंचवडवर अन्याय होत असल्याबाबत स्थायी समिती सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पीएमपीएमएलने गेल्या दहा वर्षांत पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत बसव्यवस्था सक्षम करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसून वाहतुकीवरचा ताण वाढला आहे, अशी तक्रार सदस्यांनी केली होती. याच मुद्द्यावरून सावळे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला धारेवर धरले होते. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी आणि महिलांसाठी स्वतंत्र बसेस सुरू कराव्यात, तोपर्यंत पीएमपीसंदर्भातील कोणताही विषय मंजूर करणार नाही, अशी भूमिका सावळे यांनी घेतली होती. त्यानंतर मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांना चहापानाचे निमंत्रण देऊन चर्चा केली होती. व तीन महिन्यांत पीएमपी सक्षम करण्यासाठी निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. >निगडी येथून पीएमपीएमएलची वातानुकूलित बस सुरू केली आहे. गुरुवारी निगडी येथून महिलांसाठी स्वतंत्र बस धावणार आहे. याशिवाय मोशी, स्पाइन रोड येथील सेक्टर क्रमांक १३ येथून प्रथमच बस सुरू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील अंतर्गत बसव्यवस्था सुधारण्यासाठी लवकरच ८० मिनीबस सुरू करण्याचे नियोजन पीएमपीएमएल प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत बुधवारी मुंढे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.