शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरात तीन घरे फोडली

By admin | Updated: June 30, 2016 01:44 IST

आज दुपारी बारा ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान शहराच्या हद्दवाढीतील भागात असणाऱ्या लोकवसाहतीत भरदिवसा तीन घरे फोडली.

इंदापूर : आज दुपारी बारा ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान शहराच्या हद्दवाढीतील भागात असणाऱ्या लोकवसाहतीत भरदिवसा तीन घरे फोडली. यामध्ये ८६ हजारांची रोकड, ४ लाख २० रुपये किमतीचे १४ तोळे सोने असा ५ लाख २० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटून नेला आहे. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदवण्याचे काम सुरु होते.सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात कुलूपबंद असणारी घरे शोधून काढूनच चोरट्यांनी मजबूत हात मारला आहे. दाराचे कडी कोयंडे उचकाटून दरवाजा उघडून आत प्रवेश करुन चोरट्यांनी घरातले सामान अस्ताव्यस्त केले आहे. केवळ रोकड व दागिन्यांवरच त्यांनी हात साफ केला आहे. किंमती मोबाईल अथवा अन्य वस्तूंना हात लावलेला नाही. यामध्ये दोन शिक्षकांची घरे आहेत.सविस्तर माहिती अशी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान दत्तात्रय चंद्रकांत भोंगळे (रा. साई अपार्टमेंट, बाब्रस मळा, विद्या प्रतिष्ठानजवळ, इंदापूर) यांच्या घरात पहिली घरफोडी झाली. ६ हजार रुपयांची रोकड व ९६ हजार रुपयांचे ३ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. भोंगळे हे त्यावेळी आपल्या पोंदकुलवाडी येथील शेतात गेले होते. त्यांच्या पत्नी विद्या प्रतिष्ठानमध्ये शिक्षिका आहेत. त्या शाळेत होत्या. त्यानंतर दुपारी साडेतीन ते साडेचार वाजण्याच्या सुमारास जयवंत विष्णू ताटे व डॉ. देविदास विठ्ठल बोंगाणे (दोघे रा. परिमल हौसिंग सोसायटी, पडस्थळ रोड इंदापूर) यांची घरे चोरट्यांनी फोडली. ताटे यांच्या घरातून ४५ हजार रोख, २ लाख ३० हजार रुपयांचे ६ तोळे सोने असा ऐवज त्यांनी लुटला. तर बोंगाणे यांच्या घरातून ३५ हजार रुपये व १ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ५ तोळे सोने लांबवले. ताटे हे एसबीआय बँकेत नोकरीस आहेत. त्यांच्या पत्नी बावड्यातील शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. डॉ. बोंगाणे आपल्या दवाखान्यात होते. तर त्यांच्या पत्नी आपल्या औषधाच्या दुकानात होत्या. (वार्ताहर)