शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उन्हाने प्राण्यांना आजार

By admin | Updated: May 17, 2016 02:36 IST

वातावरणातील बदल व वाढते ऊन पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे.

पिंपरी : वातावरणातील बदल व वाढते ऊन पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे. उष्णतेमुळे पाळीव प्राण्यांमध्ये गॅस्ट्रो, श्वसनाचे विकार, लाळ गळणे, डोळे लाल होणे, पचनसंस्थेचे असे विविध आजार दिसून येत आहेत. महापालिका पशुवैद्यकीय दवाखान्यात उष्णतेमुळे मे महिना अखेरपर्यंत ३५९० पाळीव प्राण्यांवर उपचार झाले आहेत. त्यातील पन्नासच्या वर पाळीव प्राणी उष्माघातामुळे दगावले आहेत, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी सांगितले. पशुवैद्यकीय दवाखान्यात कुत्रा, मांजर, विविध प्रकारचे प्राणी-पक्षी, ससे, कासव आदी पाळीव प्राण्यांवर उपचार केले जातात. यामध्ये देशी-विदेशी प्राण्यांचादेखील समावेश आहे. सध्याचे कमाल तापमान ३८ ते ४० डिग्री सेल्सिअस तापमान हे पाळीव प्राण्यांच्या जिवावर बेतण्यासारखे आहे. पाळीव प्राण्यांसाठी २७ डिग्री सेल्सिअसच्या पुढील तापमान शरीरासाठी घातक आहे. त्यासाठी पाळीव प्राण्यांकडे लक्ष देणे आवश्यक असते. उपचारासाठी आलेल्या बहुतांशी प्राण्यांच्या शरीरात पाणी कमी पडल्याने जास्त आजार उद्भवले आहेत. पाण्याचा अंश कमी असलेले पदार्थ प्राण्यांना दिल्याने ते घातक ठरले आहेत. त्यामुळे मूत्राशयाचे आजार बऱ्याच प्राण्यांमध्ये दिसून आले आहेत. पाळीव प्राण्यांना पोषक आहार न मिळाल्याने, तसेच बाजारातील हलक्या दर्जाचा आहार दिल्यानेही बऱ्याच प्राण्यांना पोटाचे विकार झाले आहेत. त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांना कातडीचे, कानाचे, पचनसंस्थेचे विकारही जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. त्यामध्ये काळ्या रंगाच्या कुत्र्याला हे विकार जास्त झाले आहेत, तर पचनइंद्रियाचे विकार अल्सेशन, सेंट बर्नाड, पग, डायलेमिशन, बुलडॉग, बॉक्सर या कुत्र्याच्या जातीतील प्राण्यांना संसर्ग जलद झालेला आहे. (प्रतिनिधी)