शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव संपत्तीची माहिती देणे बंधनकारक होणार

By admin | Updated: January 21, 2017 00:35 IST

लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधीची निवड करताना त्याच्याविषयीची सर्व माहिती मतदाराला असावी

नाशिक : लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधीची निवड करताना त्याच्याविषयीची सर्व माहिती मतदाराला असावी यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना प्रतिज्ञापत्राद्वारे स्वत:ची माहिती जाहीर करावी लागणार असून, यापूर्वी जर निवडणूक लढविलेली असेल तर अशा लोकप्रतिनिधींना गेल्या निवडणुकीच्या वेळी नमूद केलेल्या संपत्तीची व सध्याच्या संपत्तीची माहितीदेखील जनतेसाठी खुली करावी लागणार आहे. आयोगाच्या या निर्णयाने लोकप्रतिनिधी झाल्यानंतर संपत्तीत वाढ झालेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, जनतेमध्येही उमेदवारांच्या मालमत्तेविषयी उत्सुकता वाढीस लागली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात आदेश काढून उमेदवाराने नामांकन सादर करताना द्यावयाच्या शपथपत्रात काही बदल सुचविले असून, होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने उमेदवाराचे वय, शिक्षण, व्यवसाय, अपत्यांची संख्या, दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीकरिता शिक्षा होऊ शकेल अशा प्रलंबित प्रकरणांची संख्या, ज्या अपराधासाठी दोषी ठरविण्यात आलेले आहे आणि एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे अशा प्रकरणांची संख्या, उमेदवाराचा पॅन क्रमांक, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, कुटुंबाच्या जंगम मालमत्तेचा तपशील, कुटुंबाच्या स्थावर मालमत्तेचा तपशील, एकूण मालमत्ता, देय असलेल्या सार्वजनिक वित्तीय संस्थांकडील दायित्वे, थकीत रकमा याची माहिती उमेदवारांना शपथपत्रावर द्यावी लागणार आहे. अलीकडेच राज्य आयोगाने उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदान केंद्राबाहेर लावण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात प्रामुख्याने उमेदवारावर पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची माहिती मतदारांना व्हावी व त्यांनी सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करावे असा त्यामागचा हेतू आहे. त्याचबरोबर उमेदवाराने यापूर्वी लढविलेल्या निवडणुकीच्या वेळी दाखविलेल्या संपत्तीची माहितीही आयोगाने सक्तीची केली आहे. ज्यांनी निवडणूक लढविली व पराभूत झाले त्यांना या माहितीविषयी आक्षेप असण्याचे कारण नसले तरी, गेल्या निवडणुकीत विजय मिळविलेल्या व सत्ता भोगलेल्यांनी मात्र त्याचा धसका घेतला आहे. आयोगाने गेल्या निवडणुकीत उमेदवाराने संपत्तीचे दिलेले विवरण व सध्या असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचे मूल्य जाहीर करण्याची अट उमेदवारांना घातली आहे. (प्रतिनिधी)