शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

१४ शहरांना वाढीव एफएसआय

By admin | Updated: November 20, 2015 01:12 IST

राज्यातील १४ ड वर्ग महापालिकांसाठी एकच विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) तयार करण्यात आली असून, चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढविण्यात आला आहे.

- यदु जोशी,  मुंबईराज्यातील १४ ड वर्ग महापालिकांसाठी एकच विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) तयार करण्यात आली असून, चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढविण्यात आला आहे. आतापर्यंत मूळ एफएसआय एक इतका होता, आता तो १.३० इतका राहील. औद्योगिक क्षेत्रात निवासी बाांधकामे करण्यास अनुमती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियमावलीला मंजुरी दिली. या महापालिकांमध्ये चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड-वाघाळा, औरंगाबाद, परभणी, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाडा, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि मालेगाव महापालिकेचा समावेश आहे. यातील औरंगाबाद ही आता क वर्ग महापालिका असली, तरी सर्व १४ महापालिकांसाठी एकच विकास नियंत्रण नियामवली तयार करण्यासाठी समितीची स्थापना २०१२ मध्ये झाली, तेव्हा औरंगाबाद ही ड वर्ग महापालिकाच होती. या सर्व महापालिकांमध्ये आता हस्तांतरणीय विकास शुल्क (टीडीआर) दिला जाणार आहे. समान नियमावलीबाबतची अधिसूचना नगरविकास विभागाचे अवर सचिव संजय सावजी यांनी आज निर्गमित केली. त्यावर आता एक महिन्याच्या आत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. शैक्षणिक, वैद्यकीय, आयटी, बायोटेक्नॉलॉजी पार्क, धार्मिक स्थळे, स्टार हॉटेल्स यांच्या उभारणीसाठी अधिमूल्य (प्रीमियम) आकारून वाढीव चटई निर्देशांक (एफएसआय) देण्यात येणार आहे.शेतीचा बिगरशेती वापरशेतजमिनीचा वापर शैक्षणिक, वैद्यकीय, आयटी; बायोटेक्नॉलॉजी पार्क, पेट्रोल पंप, अ‍ॅम्युझमेंट पार्क, प्रशिक्षण केंद्रांच्या उभारणीसाठी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष नगर योजना, हेरिटेज इमारती, म्हाडाच्या इमारतींची पुनर्बांधणी, उत्पन्न गटाच्या सदनिका, पर्यावरणपूरक इमारती, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग आणि सोलर वॉटर हीटिंग सीस्टिमची उभारणी करण्यासंदर्भात नियमावली निश्चित करण्यात आल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातही घरेऔद्योगिक क्षेत्रामध्ये रहिवासी आणि वाणिज्यिक वापराला अनुमती देण्यात आली आहे. एकूण उपलब्ध एफएसआयच्या २५ टक्के एफएसआय हा त्यासाठी वापरता येईल. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रांमध्ये आता निवासी बांधकामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. प्रीमियमवर जादा एफएसआयरस्त्याच्या रुंदीनुसार जादा एफएसआय देण्यात येणार आहे. त्यात ९ मीटर रुंदीच्या रस्त्यालगत असलेल्या बांधकामांसाठी १.३० इतकाच एफएसआय असेल. ९ ते १२ मीटर, १२ ते १८ मीटर, १८ ते २४ मीटर, २४ ते ३० मीटर आणि ३० मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यालगत असलेल्या बांधकामांना १.३० इतका मूळ एफएसआय दिला जाईल आणि प्रीमियम भरून ०.३० इतका एफएसआय घेता येईल, तसेच किती रुंदीच्या रस्त्यालगतच्या बांधकामासाठी किती टीडीआर दिला जाईल, हेही निश्चित करण्यात आले आहे. असा मिळणार टीडीआर९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांलगत टीडीआर दिला जाणार नाही. ९ ते १२ मीटर रस्त्यालगत एक हजार चौरस मीटरच्या भूखंडावर ०.२० इतका टीडीआर दिला जाईल. एक हजार ते ४ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर ०.४० इतका टीडीआर मिळेल. ४ हजार चौरस मीटरपेक्षा जास्तीच्या भूखंडावर ०.४० इतका टीडीआर मिळेल. १२ ते १८ मीटर रुंदीच्या रस्त्यालगत अनुक्रमे ०.३०, ०.५० आणि ०.६५ इतका टीडीआर मिळेल.१८ ते २४ मीटरच्या रस्त्यालगत अनुक्रमे ०.३०, ०.६० आणि ०.९० इतका टीडीआर मिळेल. २४ ते ३० मीटरच्या रस्त्यालगत हा टीडीआर अनुक्रमे ०.३०, ०.८० आणि १.१५ इतका दिला जाईल. ३० मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यालगत अनुक्रमे ०.३०, १.०० आणि १.४० इतका टीडीआर दिला जाईल. जादा एफएसआय आणि टीडीआरची सवलत ही निवासी आणि व्यावसायिक बांधकामांसाठी असेल