शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याची चिंता वाढतेय

By admin | Updated: July 2, 2016 02:42 IST

तलाव क्षेत्रात अधूनमधून पाऊस डोकावत असल्याने गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस पडला आहे़

मुंबई : मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसाने चाकरमान्यांना त्रास होत असला तरी तलाव क्षेत्रात अधूनमधून पाऊस डोकावत असल्याने गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस पडला आहे़ त्यामुळे आवश्यक जलसाठ्याच्या आठ टक्केच साठा तलावांमध्ये जमा झाला आहे़ मान्सून यंदा मुंबईत विलंबानेच दाखल झाला़ गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतलेली नाही़ सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईचे पाणी पाणी केले़, तरी तलाव क्षेत्र मात्र तहानलेलेच आहेत़ हा पाऊस गेल्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमीच आहे़ त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम एक लाख १० हजार दशलक्ष लीटर जलसाठा असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली़वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे़ गेल्या वर्षी अपुरा पाऊस पडला होता, तरीही जून महिन्यात तलावांमध्ये तीन लाख ३८ हजार २१७ दशलक्ष लीटर जलसाठा होता़ मात्र यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच तलावांमध्ये पाऊस फिरकलेला नाही़ त्यामुळे पाण्याचे टेन्शन वाढले आहे़ (प्रतिनिधी)मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून २० टक्के पाणीकपात सुरू असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़