शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाहीसोबतच्या गृह प्रकल्पाची मुदत वाढवली

By admin | Updated: August 23, 2015 00:15 IST

मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसपीपीएल) कंपनीने जमीन मालक, विकासकांकडून निविदा मागविल्या होत्या. त्याला ७५ जणांनी प्रतिसाद

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसपीपीएल) कंपनीने जमीन मालक, विकासकांकडून निविदा मागविल्या होत्या. त्याला ७५ जणांनी प्रतिसाद दिल्याने एसपीपीएलने निविदा सादर करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. २0२२पर्यंत सर्वांना घर देण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे. त्यानुसार राज्यातील विविध प्राधिकरणांमार्फत गृह उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या १० वर्षांपासून गृह उभारणीचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी एसपीपीएलने प्रयत्न सुरू केले आहेत. १० वर्षांपूर्वी एसपीपीएलने विविध ठिकाणी १० प्रकल्प राबवून १0 हजार ६७२ घरे बांधली होती. एसपीपीएलला शासनाकडून निधी मिळाल्याने प्रकल्पाने खासगी जमीन मालक आणि विकासकांकडून परवडणारी घरे उभारण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. एसपीपीएलसोबत संयुक्तरीत्या गृहबांधणी प्रकल्प राबवून मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उपलब्ध करून द्यावीत, त्याबदल्यात विकासकांना काय मोबदला हवा, याबाबत एसपीपीएलने १५ जुलैला संबंधितांकडून निविदा मागविल्या होत्या. या जाहिरातीला ७५ विकासकांनी प्रतिसाद दिला. विकासकांनी रस दाखविल्याने कंपनीचे बंद पडलेले काम आता विकासकांमार्फत पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.