शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅन द स्पॉट’ दंडासाठी आता वाढीव मुदत

By admin | Updated: November 12, 2016 03:51 IST

काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मुंबई वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर करण्यात येणाऱ्या ‘आॅन द स्पॉट’ कारवाईवरही परिणाम होत आहे. वाहतूक पोलिसांकडून या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दंड आकारताना वाहनचालकांकडून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी शक्कल लढवली असून, नव्या नोटा किंवा सुटे पैसे घेऊन सात दिवसांत दंड भरण्याची मुभा दिली जात आहे. १६ आॅगस्टपासून मुंबई वाहतूक पोलिसांनी नवीन दंड आकारणी करण्याचा निर्णय घेतला. यात दंडाच्या रकमेत चांगलीच वाढ झालेली आहे. त्यामुळे विना हेल्मेट, फॅन्सी नंबर प्लेट, वेगाने वाहन चालविणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, रेसिंग, टेल लाईट्स व रिफ्लेक्टरशिवाय वाहन चालवणे याशिवाय अन्य नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडून ५00 ते १000 रुपये दंड आकारला जातो. हा निर्णय लागू झाल्यामुळे चालकांमध्ये चांगलीच धास्ती लागून आहे. मात्र ९ नोव्हेंबरपासून याच गुन्ह्यांखाली आॅन द स्पॉट कारवाई करून दंड वसूल करताना मुंबई वाहतूक पोलिसांची पंचाईत होत आहे. ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दंडात्मक कारवाई करताना या नोटा घेऊ नका, अशा सूचनाच वाहतूक पोलिसांना करण्यात आल्या. त्याऐवजी लायसन्स घेऊन आणि चलान देऊन वाहनचालकांना नव्या नोटा किंवा सुटे पैसे घेऊनच चौकीवर बोलावण्यात येत आहे. मात्र सुट्या पैशांचा असलेला अभाव यामुळे चालकांना दंड भरताना नाकीनऊ येत आहे. ही बाब हेरून पाच ते सात दिवसांत दंड भरण्याची मुभा वाहनचालकांना देण्यात आली आहे.