शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रक्तक्षयामुळेही मातामृत्यूच्या प्रमाणात वाढ

By admin | Updated: July 5, 2016 01:04 IST

राज्यात मातामृत्यूमधील मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू हे रक्तक्षयाने (अ‍ॅनिमिया) होत असल्याचे राज्य शासनाच्या अहवालातून समोर आले आहे. मागील चार वर्षांची आकडेवारी पाहता

पुणे : राज्यात मातामृत्यूमधील मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू हे रक्तक्षयाने (अ‍ॅनिमिया) होत असल्याचे राज्य शासनाच्या अहवालातून समोर आले आहे. मागील चार वर्षांची आकडेवारी पाहता गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षयाची समस्या जास्त असल्याचे दिसते. ग्रामीण किंवा दुर्गम भागात गर्भवती महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे या आकडेवारीतून समोर येत आहे. साधारणत: व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ ते १४ असणे आवश्यक असते. त्यातही महिला गर्भवती असताना हे प्रमाण योग्य असणे अत्यावश्यक असते. मात्र महिलांमध्ये आजही आहाराबाबत पुरेशी जागरूकता नसल्याने हे प्रमाण कमी असल्याचे आढळते. अनेक गर्भवती स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी सहा किंवा सात असल्याचे दिसते. त्यामुळे १५ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये रक्तक्षय मोठ्या प्रमाणात आढळते. राज्याच्या २०१२ ते २०१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार मातामृत्यूचे प्रमाण जिल्हा आणि महापालिका स्तरावर जास्त आहे. (प्रतिनिधी)आरोग्य विभागाकडून योजना सुरूदीर्घकाळ शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल तर रक्तदाब कमी होणे, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारखी लक्षणे महिलांमध्ये दिसू लागतात. सात मिलीग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबिन असणाऱ्या महिलांना रक्तक्षय आहे, असे समजले जाते.मातामृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य आरोग्य विभागाकडून नवसंजीवनी योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना यांसारख्या योजना राबविल्या जातात.- डॉ. दिगंबर कानगुले, प्रमुख-माता व बालविकास विभाग