अलिबाग : यंदाचा ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन, महिला साक्षरता दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या महिला दिनाचे औचित्य साधून महिला मतदारांसाठी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पात्र महिला मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी शीतल तेली- उगले यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे रायगड जिल्ह्यात सर्व विभागीय व तालुका स्तरावर महिला मतदार साक्षरता दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण हे ९२५ आहे. तसेच ५ जानेवारी २०१७ रोजी अंतिम प्रसिध्द झालेल्या मतदार यादीनुसार हे प्रमाण जिल्ह्यात १००० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९५५ निष्पन्न झाले. रायगड जिल्ह्यातील मतदार यादीनुसार पुरु ष मतदारांमागे स्त्री मतदारांचे प्रमाण समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे येत्या ८ मार्च रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिक प्रमाणात सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी महिलांच्या उन्नतीकरिता काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला कल्याण अधिकारी, आरोग्य विभागातील परिचारिका, शिक्षिका यांचे तसेच इतर अशासकीय वा शासकीय संस्था, महामंडळांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.१ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र महिला मतदारांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देऊन आपले नाव मतदार यादीमध्ये आहे अथवा नाही हे आॅनलाइन पध्दतीने तपासून पाहता येईल. आपल्या नजीकच्या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कार्यालय, मतदान कें द्रस्तरीय अधिकारी येथे भेट देऊन आपले मतदार यादीत नाव आहे अथवा नाही हे तपासून घ्यावे, असे आवाहन या निमित्ताने के ले आहे.मतदार नोंदणी झालेल्या सर्व पात्र महिला मतदारांना ८ मार्च रोजी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय येथे नवीन मतदार ओळखपत्र वाटप करण्यात येणार असल्याने नियोजित वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन तेली-उगले यांनी केले आहे. (विशेष प्रतिनिधी)>नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करामतदार यादीत नाव समाविष्ट नसेल तर नावनोंदणी करण्यासाठी नमुना नं.६ भरून सोबत वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला/पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक झेरॉक्स),रहिवासी पुरावा (वीज बिल/टेलिफोन बिल/आधार कार्ड/बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणतेही एक झेरॉक्स) अशी कागदपत्रे जोडून नजीकच्या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना नमुना नं. ६ सादर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.>दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असणे गुन्हानमुना नं.६ मध्ये आपल्या नातेवाइकाचे नाव मतदान यादीत असल्याबाबतचा तपशील भरून देणे. त्याचप्रमाणे विवाहित स्त्रियांनी आपले माहेरचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी संबंधित ठिकाणच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय, सहा. मतदार नोंदणी अधिकारी, तथा तहसीलदार कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांजकडे वगळणीचा नमुना नं.७ भरून देणे आवश्यक आहे. दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असणे हे लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० अन्वये गुन्हा असल्याचेही सूचित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये वाढ
By admin | Updated: March 6, 2017 03:16 IST