शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्या वाढवा!

By admin | Updated: April 8, 2016 01:02 IST

गुणवत्तेचे व भौतिक सुविधांचे कारण देत दर वर्षी जिल्हा परिषद शाळांतून कमी होणारी विद्यार्थिसंख्या या वर्षी पूर्णपणे रोखून ती वाढविण्यात येणार असून, यासाठी ‘आला पाडवा-पटसंख्या वाढवा’ असा कार्यक्रम हाती

पुणे : गुणवत्तेचे व भौतिक सुविधांचे कारण देत दर वर्षी जिल्हा परिषद शाळांतून कमी होणारी विद्यार्थिसंख्या या वर्षी पूर्णपणे रोखून ती वाढविण्यात येणार असून, यासाठी ‘आला पाडवा-पटसंख्या वाढवा’ असा कार्यक्रम हाती घेतला असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.८ ते १५ एप्रिल दरम्यान पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सन २0१२-१३ मध्ये २ लाख ४६ हजार ७६५ इतकी पटसंख्या होती. ती २0१३-१४ मध्ये २ लाख ३९ हजार ५३0 इतकी झाली. म्हणजे या वर्षात ७ हजार २३५ इतकी पटसंख्या कमी झाली. सन २0१४-१५ मध्ये २ लाख ३४ हजार ५६0 इतकी झाली. या वर्षात ४ हजार ९७0 इतकी पटसंख्या घटली. सन २0१५-१६ मध्ये २ लाख ३४ हजार २७0 इतकी म्हणजे या वर्षात फक्त २९0 पटसंख्या घटली. यावरून १0१३-१४ मध्ये ७ हजार २३५ इतके प्रमाण २0१५-१६ मध्ये २९0 पर्यंत कमी करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची मासिक आढावा बैैठक झाली. यात गुणवत्ता वाढीवर चर्चा करून पुढील वर्र्षात घटीचे प्रमाण शून्य करून पटसंख्यावाढ करण्याचा या वर्षी संकल्प केला आहे. सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना ‘आला पाडवा पटसंख्या वाढवा’ असे आवाहन केले असल्याचे वांजळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)> जल्हा परिषदेची एकही शाळा ‘क’ आणि ‘ड या प्रवर्गात राहणार नाही. सर्व शाळा या ‘अ’ व ‘ब’ वर्गातच असतील. हेचे पुढील काळात आमचे उद्दिष्ट राहणार असून, पालकांनी जिल्हा परिषद शाळेतच आपल्या पाल्यांना दाखल करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. मातृभाषेतच मुलांना चांगले शिक्षण मिळते यावर आमचा विश्वास आहे. पटसंख्या नक्कीच वाढलेली असेल. > जिल्हा परिषद शाळाही गुणवत्तेत कुठे कमी नाहीत, हे पालकांना पटवून देता आले पाहिजे. यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी गुणवत्तावाढीसाठी आम्ही हे करीत आहोत, असा ठाम कार्यक्रम घेऊन त्याची जाहिरात करावी.- कुलदीप कोंडे,जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना