शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा प्रवाह वाढल्याने आलमट्टी धरणाचे २० दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 19:31 IST

विजयपूरसह परिसरातील ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस झाला. त्याचबरोबर आलमट्टी धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे.

ठळक मुद्देआलमट्टी धरण परिसरात पावसाचा जोर कायम पुराचा सामना करण्यास प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी के़ बी़ शिवकुमार पूर परिस्थितीचा सामना करण्याकरिता तालुकास्तरीय अधिकाºयांच्या बैठका

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर/विजापूर : विजयपूरसह परिसरातील ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस झाला. त्याचबरोबर आलमट्टी धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. याचा परिणाम झाल्याने कृष्णा नदी पाणीपातळीत झपाटयाने वाढ होत आहे. शुक्रवारी आलमट्टी धरणाच्या २६ दरवाजांपैकी २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच जलविद्युत पेंद्रासाठी ४५ हजार क्यूसेक पाणी अतिरिक्त सोडण्यात येत आहे. त्यामुळे २९० मेगावॅट विजेचे उत्पादन सुरू झाले आहे. सध्या आलमट्टी धरणात जेवढे पाणी येत आहे. त्याच प्रमाणात धरणातून पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने कृष्णेची पाणी पातळी थोडी खालावली आहे. त्यामुळे धरणात येणारे पाण्याची आवक येथून पुढे कमी होणार आहे.विजयपूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या पाण्याची पातळीत मात्र अद्यापही वाढच होत आहे.सोलापूरच्या उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी नदीचा प्रवाह ४.८० मीटर वरून ५.४० मीटर वाढल्याने सोन्न बॅरेजमध्ये ७० हजार क्यूसेक पाणी येत आहे. त्यामुळे या बॅरेजचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच तेवढेच पाणी धरणातून बाहेर सोडण्यात येत आहे. यामुळे भीमेच्या पाणी पातळीत अजूनही वाढण्याची शक्यता आहे, असे केएनएनएलचे अधिकारी के. एस. सालीमठ यांनी पत्रकारांना कळविले आहे. बºयाच वर्षानंतर विजयपूर जिल्हातील कृष्णा आणि भीमा या दोन्ही नद्या दुथडी भरून वहात आहेत. त्यामुळे या भागातील जनतेला शेतकरी आनंद झाला आहे.----------------पुराचा सामना करण्यास प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी के़ बी़ शिवकुमार  बागलकोट जिल्ह्यातील मलप्रभा, घटप्रभा नद्यांपेक्षा कृष्णा नदीला प्रवाह अधिक असला तरी पुराचा कोणताही धोका नसून तरी पण खबरदारी म्हणून विजयपूर जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन पुराचा सामना करण्यास सज्ज असल्याची माहिती विजयपूर जिल्हाधिकारी शिवकुमार यांनी आलमट्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून सोडण्यात आलेले पाणी जमखंडी तालुक्मयातील हिप्परगी धरणातून पुढे आलमट्टी धरणाकडे जात आहे. आलमट्टीत पूर्ण क्षमतेची ५१९.६ मीटर पातळी ठेवून पाणी विसर्ग सुरू असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. पूर परिस्थितीचा सामना करण्याकरिता तालुकास्तरीय अधिकाºयांच्या बैठका घेण्यात आल्या असून प्रत्येक ठिकाणी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यात कृष्णा पूरग्रस्त २७ खेडी असून त्यात तत्काळ होणाºया ११ खेडयांना प्राधान्य देऊन ९ बोटी, जलतरणपटू, सेफ्टी जॅकेट, स्थलांतर करावे लागल्यास त्यांना नित्य उपयोगी साहित्य पुरविण्याची तयारी असल्याची माहिती दिली.