शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तलावांची साठवणक्षमता वाढवा

By admin | Updated: May 17, 2016 01:57 IST

दौंडच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.

दौंड : भविष्यात पाण्याची समस्या कठीण होत जाणार आहे. तेव्हा दौंडच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल. तलावांच्या खोलीकरणाची गरज असून चित्रीकरण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनीि अधिकाऱ्यांना दिल्या.खडकवासला धरणातून दौंडसाठी पाणी सोडल्यानंतर पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाजवळ पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी आले असता ते बोलत होते. माटोबा तलाव, वरवड येथील व्हिक्टोरिया तलावावर जावून पाणी किती आले हे पाहिले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राहुल कुल, शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, दौंडचे ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे, भाजपा किसान मोर्चाचे वासुदेव काळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, तानाजी दिवेकर, विकास जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, तहसीलदार उत्तम दिघे, गटविकास अधिकारी संतोष हराळे उपस्थित होते. (वार्ताहर)>एमआयडीसीचे पाणी बंद करावायनरीचे व एमआयडीसीचे पाणी बंद करावे, अशी मागणी वासुदेव काळे व तानाजी दिवेकर यांनी केली. नाहीतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहणार नाही. माटोबा तलावाचे खोलीकरण गरजेचे माटोबा तलावाच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी तलावाची उंची वाढविण्याची मागणी तेथील काही पदधिकाऱ्यांनी केली. राहुल कुल यांनी उंची वाढविण्याऐवजी खोलीकरण केल्यास कोणाच्याही जमिनी अधिग्रहण न करता जास्तीचे पाणी साठवता येईल, अशी भूमिका मांडली. यावर बापट यांनीदेखील खोलीकरण करणे सोयीस्कर राहील, संबंधित अधिकाऱ्यांनी तलावाचे चित्रीकरण करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या.ड्रेनेजचे पाणी शेतीला द्यादिवसेंदिवस दौंडची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे काळाची गरज आहे. शहरातील ड्रेनेजचे पाणी शेतीला दिले, तर निश्चितच त्याचा उपयोग शेतीसाठी होईल, याचाही दौंड नगर परिषदेने विचार करणे गरजेचे आहे. दौंडच्या पाण्याचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा. तो सोडविण्यासाठी योग्य ते कामकाज केले जाईल, असे शेवटी बापट म्हणाले. पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नाथाचीवाडी परिसरात तलावातील पाणी देण्याचे आदेश देऊनदेखील अधिकारीवर्ग पाणी देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार उपस्थित शेतकऱ्यांनी केल्यानंतर आमदार राहुल कुल यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून टाळाटाळ करीत असल्याबद्दल चांगलेच फैलावर घेतले.