शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यांच्या बढत्या अडल्या: सेवा प्रवेश नियमांचा झाला ‘पुराभिलेख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 02:56 IST

सन १६३० पासूनचे राज्याचे रेकॉर्ड सांभाळणाºया राज्य पुराभिलेख संचालनालयातील बहुतेक सर्व अधिकाºयांची पदोन्नती ही सेवा प्रवेश नियमांअभावी अडली आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : सन १६३० पासूनचे राज्याचे रेकॉर्ड सांभाळणाºया राज्य पुराभिलेख संचालनालयातील बहुतेक सर्व अधिकाºयांची पदोन्नती ही सेवा प्रवेश नियमांअभावी अडली आहे. या नियमांचा गेल्या पाच वर्षांत फुटबॉल झाला असून त्यात अधिकाºयांच्या भवितव्याचा खेळखंडोबा सुरु आहे. पुराभिलेख विभागाचे सेवानियमच पुराभिलेख होतात की काय अशी अवस्था आहे.राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालय येते. या संचालनलयाच्या सेवा प्रवेश नियमांना राज्यपालांनी २०१२ मध्ये मंजुरी दिलेली होती. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या सहा वर्षांत त्यांची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. या सेवा प्रवेश नियमांत काही सुधारणा करायच्या आहेत, असे कारण देऊन ते सुरुवातीला थांबविण्यात आले. राज्यपालांनी मंजुरी दिलेले सेवाप्रवेश नियम हे शासकीय मुद्रणालयात छपाईलाही गेले पण तेथून ते परत मागविण्यात आल्यानंतर त्याचा रखडण्याचा प्रवास सुरू झाला आणि तो आजही थांबलेला नाही.सुधारित नियमांचा प्रवास मग पुराभिलेख कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, विधी व न्याय विभाग असा सुरू राहिला. दरवेळी कुठल्या ना कुठल्या उणिवांवर बोट ठेऊन सामान्य प्रशासन विभाग या नियमांबाबत विचारणा करीत राहते आणि पुराभिलेख विभागातील एक अधिकारी सहा-सहा महिने त्याचे उत्तरच देत नाहीत, अशी धक्कादायक माहिती आहे. आस्थापनेचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे झारीतील शुक्राचार्य त्यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पदोन्नतीची साखळीच थांबली असून गेली पाच-सहा वर्षे अधिकारी पदोन्नतीपासून वंचित आहेत.राज्यपालांनी मंजुरी दिलेले सेवानियम जसेच्या तसे मंजूर करावेत आणि नंतर त्यात काही सुधारणा करायची असल्यास ती करता येईल, असा मध्यममार्ग स्वीकारल्यास पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी या विभागातील अधिकाºयांची भावना आहे.अतिरिक्त कार्यभार-सध्या हा विभाग पूर्णत: प्रतिनियुक्तीवर किंवा विभागातील अधिकाºयांना अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांच्या भरवश्यावर चालविला जात आहे.संचालक, सहाय्यक संचालक, उपसंचालक, अधीक्षक, लेखापाल या पदांचा त्यात समावेश आहे.