शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

येऊर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवा

By admin | Updated: June 13, 2016 03:52 IST

ठाणे महापालिकेने हार्ट आॅफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व निसर्गाचे वरदान लाभलेल्या येऊर यापर्यटनस्थळाकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे

सुरेश लोखंडे,

ठाणे- पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिकेने हार्ट आॅफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व निसर्गाचे वरदान लाभलेल्या येऊर या पर्यटनस्थळाकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. याशिवाय, अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे.साफसफाईअभावी येऊरच्या बहुतांश परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. २४ तास वन विभागाचे लक्ष असतानाही चोरीच्या मार्गे युवक येऊरच्या जंगलात येतात. त्यांच्याकडून या वनराईचेही नुकसान होऊन या पर्यटनस्थळाच्या प्रदूषणात वाढ होते. त्यास नियंत्रणात आणण्याची गरज आहे. संभाव्य धोके लक्षात घेऊन महापालिकेने या परिसराकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीशी सामना करण्यासाठी या परिसरात आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन कक्ष सुरू करण्याचीदेखील या परिसरात गरज आहे. मोबाइलही या परिसरात लागत नाही. हवाई दलाचे येथे कार्यालय आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत या परिसरात कुठे काय होते, याचा थांगपत्ताही नसतो. ते नियंत्रणात ठेवून संभाव्य धोके टाळण्यासाठी आपत्ती नियंत्रणाची गरज आहे. ठाणे महापालिकेच्या नियंत्रणात असलेल्या येऊरला शहरातील सोयीसुविधांचा अभाव आहेच. येऊरगाव, पाटीलपाडा, जांभूळपाडा, वनीचापाडा आदी सहा गावपाडे असलेल्या या जंगल परिसरात राजकीय नेत्यांचे बंगलेही आहेत. सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीच्या परिसरात शनिवार, रविवार आणि सुटीच्या कालावधीत मोठ्या संख्येने युवकयुवती येतात. त्यांचा अक्षरश: धिंगाणा सुरू असतो.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेला येऊर हा डोंगरदऱ्याखोऱ्यांचा परिसर आहे. प्रवेश बंद असलेल्या या जंगलात बिबट्यांचा वावर असतो. अंधाराचा फायदा घेऊन बिबट्यांनी रहिवासी क्षेत्रात शिरकाव केल्याच्या घटना आजवर घडलेल्या आहेत. या जंगलात शेवट असलेल्या दोन आदिवासी पाड्यांना तर वीजपुरवठ्याचा अद्यापही अभाव असल्यामुळे पावसाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नरेश मोगरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.>गावपाड्यात राबवली स्वच्छता मोहीमठाणे : स्वच्छ भारत मिशनद्वारे वन्यजीव संरक्षक जंगल, राखीव वन क्षेत्रात स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे आदेश केंद्रीय मंत्रिमंडळाने दिले आहेत. त्यानुसार, पर्यावरण दिनाचे औचित्य लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या घनकचरा स्वच्छता विभाग व येऊर वन विभागाच्या वतीने रविवारी येऊरच्या जंगलासह परिसरातील गावपाड्यांत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. सुमारे चार गाड्या कचरा उचलला. येऊरगाव, पाटणपाडा, वनीचापाडा या रहिवासी भागांसह जंगलातील पिकनिक पॉइंटवरील कचरा गोळा करण्यात आला. पालिका उपायुक्त अशोक बुरकुले, घनकचरा विभागाचे प्रमुख राजेंद्र बनसोड, उपविभागप्रमुख जी.बी. खिल्लारे, वनसंरक्षक वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. पालिकेच्या २८ व वन विभागाच्या २० कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्यात आली. येऊरच्या जंगलात फिरण्यासाठी, मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा केला जातो. पाणी, मद्य, शीतपेयांच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या पिकनिक पॉइंटवर मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. या कचऱ्यासह गावपाड्यांतील ठिकठिकाणी साचलेला कचरा जेसीबीद्वारे उचलण्यात आल्याचे खिल्लारे यांनी सांगितले. याआधीदेखील जल दिनाचे औचित्य साधून पाणीपुरवठा करणारे तलाव, जंगलातील नाले, जलवाहिनीजवळील कचराही उचलण्यात आला होता. पर्यावरण दिनानिमित्ताची ही मोहीम १५ जूनपर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर केल्यामुळे रविवारी सुटीच्या दिवशीही मोहीम हाती घेतल्याचे खिल्लारे यांनी सांगितले.