शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपांवरील कारवाईची व्याप्ती वाढणार

By admin | Updated: June 21, 2017 03:04 IST

कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास शंभर पेट्रोल पंपांची माहिती पोलिसांकडे तयार आहे.वाहनांमध्ये पेट्रोल टाकणाऱ्या मशिनच्या पल्सर असेंब्लीमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप लावून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी शुक्रवारपासून कारवाईला सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत ठाण्यातील सहा, नाशिकमध्ये दोन तर पुणे आणि खोपोली येथील प्रत्येकी एक अशा १० पेट्रोलपंपांवर धाडी टाकण्यात आल्या. मंगळवारी बदलापूर आणि मानपाडा येथील दोन पंपांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. पोलिसांनी महिनाभर या चौर्यकर्माचा अभ्यास करून राज्यभरातील जवळपास १०० पंपांची यादी तयार केली आहे. प्रत्यक्ष कारवाई यापेक्षाही जास्त पंपांवर होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कारवाई सुरू करण्यापूर्वी पोलिसांनी बऱ्यापैकी खबरदारीही घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वजन व मापे निरीक्षण विभागास उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून कारवाईबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या विभागाकडून पेट्रोल पंपांचे नियमित निरीक्षण केले जात असते. निरीक्षण केल्यानंतर वाहनांमध्ये पेट्रोल भरणाऱ्या मशीनमध्ये हेराफेरी होऊ नये, यासाठी ती सील केली जात असते. आता पोलिसांची कारवाई सुरू राहील, तोपर्यंत पंपांवरील मशिन्सचे सील काढू नये, अशी सूचना या विभागास दिल्या आहेत. शेट्येला उत्तर प्रदेशातून आणणारउत्तर प्रदेशचे विशेष कृती दल आणि ठाणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये डोंबिवलीच्या विवेक शेट्येसह दोघांना २२ मे रोजी अटक केली होती. दोन्ही आरोपी सध्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत आहेत. विवेक शेट्येचे डोंबिवलीमध्ये वर्कशॉप असून, त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक चिप्सचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याने उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांनाही इलेक्ट्रॉनिक चिप्सचा पुरवठा केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे चौकशीसाठी विवेक शेट्येला ठाणे पोलीस ताब्यात घेण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहेत.बदलापुरातील पेट्राल पंप सीलबदलापूर कात्रप परिसरातील मंगळवारी फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या पंपवरील प्रत्येक मशिनमध्ये पासवर्ड टाकून त्याद्वारे ग्राहकांना कमी इंधन दिले जात होते. हा प्रकार उघड झाल्यावर पोलिसांनी पंप सील केला आहे. येथे प्रत्येक ५ लीटरमागे २०० एमएल कमी पेट्रोल देण्यात येत होते. मराठवाडा, खान्देश रडारवरठाणे पोलिसांची चार पथके सध्या मराठवाडा आणि खान्देश भागात आहेत. त्या भागातील काही पेट्रोल पंपांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत येथील पंपांवर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.