शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट कक्ष अधिकाऱ्यांना वाढीव पगार

By admin | Updated: August 10, 2016 04:26 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासनात नोकरीस असलेल्या कक्ष अधिकाऱ्यांनाही मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांप्रमाणे १ एप्रिल २०१३ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू केली जावी

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासनात नोकरीस असलेल्या कक्ष अधिकाऱ्यांनाही मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांप्रमाणे १ एप्रिल २०१३ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू केली जावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.न्यायालयाच्या अपीली शाखेत काम करणारे महेंद्र रुपवते यांनी त्यांच्यासह न्यायालयातील तमाम कक्ष अधिकाऱ्यांच्या वतीने केलेली याचिका मंजूर करून न्या.अनूप मोहता व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी हा आदेश दिला.राज्य शासनाच्या वित्त विभागाने ११ फेब्रुवारी २०१३ रोजी एक शासन निर्णय (जीआर) जारी करून मंत्राल़यातील कक्ष अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीचे सहाव्या वेतन आयोगानुसार पुनर्निधारण केले होते. त्यानुसार या कक्ष अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी रु. ९,३००-रु.३४,८०० व ग्रेड पे रु. ४,६०० वरून रु. ९,३००-रु. ३४,८०० व ग्रेड पे ४,८८० अशी आणि चार वर्षांच्या नियमित सेवेनंतर रु. १५,८००-रु. ३९,१०० व ग्रेड रु. ५,४०० अशी वाढविण्यात आली होती. त्यांना ही सुधारित वेतनश्रेणी १ जानेवारी २००६ पासून ‘नोशनली’ लागू करून त्यानुसार प्रत्यक्ष वाढीव पगार १० एप्रिल २०१३ पासून दिला गेला होता.खंडपीठाने आता दिलेल्या आदेशानुसार वित्त विभागाचा हा शासन निर्णय उच्च न्यायालयातील कक्ष अधिकाऱ्यांनाही जसाच्या तसा लागू होईल. उच्च न्यायालयाच्या सेवेत मुंबईत मूळ व अपिली शाखेत तसेच नागपूर, औरंगाबाद व गोवा खंडपीठात नोकरीत असलेल्या सर्व कक्ष अधिकाऱ्यांना त्याचा फायदा मिळेल.मंत्रालय आणि उच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणची कक्ष अधिकाऱ्यांची पदे समकक्ष आहेत हे मान्य करून १९६५ पासून सरकारने दोघांनाही नेहमीच समान वेतनश्रेणी दिलेली आहे. २००६ मध्ये लागू झालेली वेतनवाढही चार वर्षाने उशिरा का होईना उच्च न्यायालयास लागू केली गेली होती. (विशेष प्रतिनिधी)उच्च न्यायालयातील कक्ष अधिकाऱ्यांना ही सुधारित वेतनश्रेणी केव्हापासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी याचे निर्देश न्यायालयाने दिले. मात्र ती लागू करण्यासाठी कोणताही निश्चित कालावधी ठरवून देणारा आदेश खंडपीठाने दिला नाही. याचिकेमधील ‘प्रेअर क्लॉज’मध्येही त्याचा उल्लेख नव्हता. खंडपीठाने त्या ‘प्रेअर क्लॉज’नुसार आदेश दिल्याने त्यात सुधारित वेतनश्रेणी किती काळात लागू करावी याचाही समावेश झाला नाही.