शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

युरियाच्या किमती वाढविणार

By admin | Updated: June 9, 2014 23:46 IST

युरिया खताची किंमत 1क् टक्क्यांनी वाढविण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, खतावरील सबसिडी कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात येणार आहे.

मुंबई : भारतीय शेतकरी ज्या खतांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतात, त्या युरिया खताची किंमत 1क् टक्क्यांनी वाढविण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, खतावरील सबसिडी कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात येणार आहे. सरकारी अधिका:यांनी दिलेल्या माहितीनुसार चार वर्षातील हा मोठा निर्णय ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युरिया खताचा अतिरिक्त वापर कमी करायचा असून, अर्थव्यवस्थेवरील सबसिडीचा ताणही कमी करायचा आहे. युरिया खताच्या किमतीत 2 वा 3 टक्के वाढ केल्यास त्याचा सबसिडीवर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे युरिया खताची किंमत किमान 1क् टक्के वाढवावी, असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. 
उल्लेखनीय म्हणजे, खतमंत्री अनंतकुमार यांचा या निर्णयाला पाठिंबा आहे.  या संदर्भात अधिका:यांनी युरिया किंमत वाढविण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडण्याची तयारी करावी किंवा जुलैमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वतीने मांडण्यात येणा:या अर्थसंकल्पात त्याचा समावेश करावा, असे अनंतकुमार यांनी म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीस मुंबई शेअर बाजाराच्या उच्चंकात चंबळ खते व रसायने कंपनीला 6.6 टक्के नफा मिळाला असून, टाटा केमिकलला 2.6 टक्के नफा मिळाला आहे. युरियावरील सबसिडी गेल्या 1क् वर्षात चारपटीने वाढली आहे, कारण याआधीच्या सरकारने या खताच्या किमती उत्पादन खर्चापेक्षाही               कमी ठेवल्या, शेतक:यांना खुश ठेवण्यासाठी घेतलेला हा निर्णय अर्थसंकल्पावर बोजा वाढविणारा ठरला आहे.
नैसर्गिक वायूची किंमत वाढविल्यास युरियाची किंमत वाढवावीच लागणार आहे. सरकारला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. तो बजेटआधी घ्यायचा की बजेटमध्ये मांडायचा एवढाच निर्णय बाकी आहे. 1 जुलैपासून नैसर्गिक वायूच्या किमती वाढविल्या जाणार आहेत. खते व रसायन मंत्रलयाने या वृत्तावर प्रतिक्रिया दिली नाही. 
(प्रतिनिधी)
 
4नैसर्गिक वायूची किंमत दुप्पट करण्याचा निर्णय सरकारला घेणो भाग पडणार आहे. युरिया खताच्या निर्मितीत नैसर्गिक वायूचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो व युरियाच्या किमतीत वायूचा वाटा चार पंचमांश इतका असतो. 
 
4नायट्रोजनयुक्त खते भारतात अर्धेअधिक शेतकरी वापरतात. भारतात वापरल्या जाणा:या खतावरील सबसिडीत या खतांची सबसिडी 11 अब्ज डॉलरची असते.