शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणामुळे मूळव्याधीच्या रुग्णांत वाढ

By admin | Updated: July 21, 2016 00:34 IST

पावसाळ्याच्या सुरुवातीला विविध संसर्गजन्य आजारांबरोबरच मूळव्याधीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे चित्र शहरात आहे.

पुणे : पावसाळ्याच्या सुरुवातीला विविध संसर्गजन्य आजारांबरोबरच मूळव्याधीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे चित्र शहरात आहे. मूळव्याधीच्या समस्येच्या रुग्णांत वाढ झाल्याने या रुग्णांची दवाखान्यांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. पावसाळ्याच्या दिवसात शहराच्या विविध भागात उपलब्ध होेणाऱ्या पिण्याच्या अशुद्ध पाण्यामुळे पोटाचे विविध विकार किंवा बद्धकोष्ठता होते. पावसाळ्यात बाहेर थंड हवा असल्याने पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठता हे मूळव्याधीचे महत्त्वाचे कारण असल्याचे जनरल फिजिशियन डॉ. अच्युत जोशी यांनी सांगितले. मूळव्याधीची समस्या अनेकदा आनुवंशिकही असू शकते. या आजारामध्ये विविध कारणांनी रक्तवाहिन्यांची वाढ होते आणि शौैचास त्रास होतो, त्याला आपण मूळव्याध झाली असे संबोधतो. यामध्ये कुंथणे, यकृताच्या समस्या, लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे रक्तवाहिन्यांची वाढ होते. या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साठून राहिल्याने गुदद्वारामध्ये आग होणे, शौैचाच्या वेळी रक्त पडणे, खडा होणे, एकावेळी पोट योग्य पद्धतीने साफ न होणे अशा समस्या उद्भवतात. यामध्येही ग्रेड १ पासून ग्रेड ४ पर्यंत प्रकार असल्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. सचिन कुबेर यांनी सांगितले. पहिल्या व दुसऱ्या ग्रेडमध्ये आजार असले, तर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते. परंतु, तिसऱ्या आणि चौैथ्या ग्रेडमध्ये मात्र शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय अनेकदा नसतो. हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच आहारावर योग्य ते नियंत्रण ठेवणे आणि जीवनशैलीत काही बदल केल्यास हा आजार आटोक्यात राहू शकतो, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>मूळव्याधीचा त्रास कमी होण्यासाठी हे कराभरपूर पाणी प्या.तेलकट आणि मसालेदार खाणे कमी करा.जेवणाच्या वेळा नियमित ठेवाआहारात पालेभाज्या, फळे योग्य प्रमाणात असू द्या.नियमित व्यायाम करा.हिरवी व लाल मिरची यांचा आहारातील वापर मर्यादित ठेवा.दही, ताक, काळे मनुका या थंड पदार्थांचा आहारात समावेश असू द्या.>बैठेकाम करणे हेही मूळव्याधीचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. सध्या आयटीमध्ये काम करणाऱ्यांना दीर्घकाळ एकाच जागेवर बसावे लागत असल्याने, तसेच दुचाकीवर बराच काळ बसल्यानेही मूळव्याधीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ठराविक काळाने जागेवरून उठून थोडे चालून येणे गरजेचे आहे. गर्भवती महिलांमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. पुरेशी झोप न होणे, अवेळी खाणे यांमुळे वारंवार पित्त वाढल्यानेही मूळव्याधीचा त्रास होतो. त्यामुळे असा त्रास झाल्यास त्यावर घरगुती उपाय न करता किंवा दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.