शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘वैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढवाव्यात’

By admin | Updated: May 19, 2016 05:09 IST

राज्यात रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून दरवर्षी साडेचार हजार नवीन डॉक्टर बाहेर पडतात.

मुंबई : राज्यात रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून दरवर्षी साडेचार हजार नवीन डॉक्टर बाहेर पडतात. पण त्या वेळी पदव्युत्तर (एमडी, एमएस) शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या १ हजार ६०० इतकीच आहे. राज्य सरकारने मनावर घेतल्यास पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढू शकतात. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) पत्र लिहिले आहे.८ आॅगस्ट २०१५ रोजी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागेसाठी ‘एमसीआय’ने मान्यता दिली असेल, तर ते महाविद्यालय केंद्र सरकारच्या परवानगीने जागा वाढवू शकते. त्या निकालानुसार राज्यातील शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवणे सहज शक्य आहे. या जागा वाढल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार असल्याचे मत सेंट्रल मार्डचे उपाध्यक्ष डॉ. अमित लोमटे यांनी व्यक्त केले. मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, तर त्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. पण, सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवल्यास सहज जागा वाढवणे शक्य आहे. कारण, जागा वाढवण्यासाठी ‘एमसीआय’च्या पुन्हा पाहणीची आवश्यकता नसते, असे मार्डने पत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)