शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांसाठी निधी वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 06:30 IST

गडकरींची मुख्यमंत्र्यांना सूचना : औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद

औरंगाबाद : राज्यातील सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधी वाढवावा, अशी सूचना केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना केली. औरंगाबादेत बुधवारी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालयातर्फे नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे आयोजन औरंगाबादेतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. सध्या महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये दुष्काळ आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी निधी प्राधान्याने उपलब्ध केला. यात महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या १०८ प्रकल्पांचा समावेश आहे. येत्या दोन-तीन वर्षांत हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास सिंचनाचे प्रमाण वाढणार आहे. तरीही मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदामंत्री महाजन यांनी लक्ष देऊन सिंचनाचा निधी वाढविला पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले. कर्नाटक, तेलंगणा ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा लहान आहेत, तरीही ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा अधिकचा निधी सिंचनावर खर्च करीत आहेत. राज्याचा सिंचन निधी वाढविण्यासाठीअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन सत्रात फिजीचे कृषिमंत्री डॉ. महेंद्र रेड्डी, आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाचे अध्यक्ष इंजि. फेलिक्स रेंडर्स यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक केंद्रीय सचिव यू. पी. सिंग यांनी केले.

या मान्यवरांची उपस्थितीफिजीचे कृषिमंत्री डॉ. महेंद्र रेड्डी, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कर्नाटकचे जलसंपदामंत्री डी.के. शिवकुमार, कृषिमंत्री के. शिवशंकर रेड्डी, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सत्यप्रताप सिंग, गोव्याचे जलसंपदामंत्री विनोदा पालिन्सर, दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन, केंद्रीय जलसंसाधन सचिव यू.पी. सिंग, केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष मसूद हुसेन, आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाचे अध्यक्ष इंजि. फेलिक्स रेंडर्स, महासचिव ए.बी. पंड्या आदी उपस्थित होते.