राकेश घानोडे / ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 20 - महागाई सतत वाढत असल्यामुळे पत्नी काळानुसार वाढीव पोटगी मिळण्यास पात्र ठरते असा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.अमरावती जिल्ह्यातील पत्नी नैनाने यवतमाळ जिल्ह्यातील पती नीरजपासून (दोन्ही नावे काल्पनिक) विभक्त झाल्यानंतर २००६ मध्ये कुटुंब न्यायालयात पोटगीसाठी याचिका दाखल केली होती. त्यावेळी तिला १५०० रुपये पोटगी मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर तिने २०११ मध्ये पोटगी वाढवून मिळण्यासाठी याचिका केली. काळानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे केवळ १५०० रुपयांत चांगले जीवन जगने अशक्य झाल्याचा दावा करून तिने ४००० रुपये पोटगीची मागणी केली होती. नीरजने या मागणीला विरोध करून पोटगी कमी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने नीरजची याचिका खारीज केली आणि नैनाची याचिका मंजूर करून तिची पोटगी मासिक १५०० रुपयांवरून २५०० रुपये केली.या निर्णयाला नीरजने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी वरीलप्रमाणे निर्णय देऊन कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. ७ हजार रुपये निवृत्ती वेतननीरजला सध्या ७ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळत असून त्याच्याकडे ४ एकर शेती आहे. तसेच, त्याच्या आईच्या नावावर ५ एकर शेती आहे. शेतीतूनही त्याला उत्पन्न मिळते. नैनाची पोटगी कायम ठेवताना ही बाबदेखील विचारात घेण्यात आली.
पत्नी काळानुसार वाढीव पोटगीस पात्र
By admin | Updated: February 20, 2017 20:03 IST