शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीजग्राहकांना दरवाढीचा झटका

By admin | Updated: November 17, 2015 02:17 IST

आॅक्टोबरच्या वीज देयकांमध्ये महावितरणने इंधन समायोजनाच्या नावाखाली सरासरी ७३.२४ पैसे प्रतियुनिट आकारणी केली आहे. परिणामी, राज्यातील सव्वादोन कोटी वीज ग्राहकांना दरमहा

मुंबई : आॅक्टोबरच्या वीज देयकांमध्ये महावितरणने इंधन समायोजनाच्या नावाखाली सरासरी ७३.२४ पैसे प्रतियुनिट आकारणी केली आहे. परिणामी, राज्यातील सव्वादोन कोटी वीज ग्राहकांना दरमहा ५९१ कोटी रुपये म्हणजे १२.७५ टक्के दरवाढीचा जबरदस्त शॉक बसला आहे. ही आकारणी ३ महिने करण्यात येणार आहे, असे परिपत्रक महावितरणने काढले आहे. म्हणजे आयोगाच्या आदेशाद्वारे प्रत्यक्ष ८.५ टक्के आणि इंधन समायोजन आकाराचे हत्यार उपसून अप्रत्यक्षपणे १२.७५ टक्के असा एकूण २१.२५ टक्के दरवाढीचा बोजा राज्यातील सर्व ग्राहकांवर किमान ३ महिने लादण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी यासंबंधीची माहिती दिली असून, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे आदेश मोडून केलेल्या वीजखरेदीमुळे ही सर्व आकारणी बसली असून, ती बेकायदेशीर आहे. या आकारणीविरोधात १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत संघटनेच्या वतीने दाद मागण्यात येणार आहे. वाढीव खर्चाची आकारणी रद्द करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.२६ जून २०१५ रोजी आयोगाने नवीन वीजदर निश्चित केले होते. जेव्हा नवे वीज दर निश्चित केले जातात; तेव्हा तत्कालीन बाजारभावानुसार वीज खरेदीचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे जुलै २०१५मध्ये इंधन समायोजन आकार शून्य असावयास हवा होता. शिवाय टप्प्याटप्प्याने तो गरजेनुसार वाढणेही अपेक्षित होते. मात्र जुलै २०१५मध्ये खरेदी झालेल्या विजेपोटी जादा खर्चाची आकारणी आॅक्टोबर महिन्याच्या देयकात करण्यात आली.