शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

यंदापासूनच वाढीव ईबीसी

By admin | Updated: October 26, 2016 02:49 IST

आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईबीसी) वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये असणाऱ्या तसेच सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या, परंतु ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या

- चंद्रकांत कित्तुरे,  कोल्हापूर

आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईबीसी) वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये असणाऱ्या तसेच सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या, परंतु ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, यांचा लाभ २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून मिळणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.ईबीसीची मर्यादा वाढविण्याची घोषणा राज्यकर्त्यांकडून गेल्या तीन वर्षांपासून केली जात होती; पण निर्णय होत नव्हता. मराठा क्रांती मूक मोर्चे निघाल्यानंतर सरकारवरील दबाव वाढला. त्यामुळे सरकारने १३ आॅक्टोबरला ईबीसी मर्यादा एक लाखावरून अडीच लाख करण्याची आणि सहा लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, यांची घोषणा केली. त्यासंदर्भातील अध्यादेश तातडीने जारी केल्याने या योजनेचा लाभ यंदापासूनच मिळणार हे निश्चित झाले आहे. शालेय तसेच उच्च व तंत्रशिक्षण खात्यानेही संबंधित शाळा, महाविद्यालयांना परिपत्रक पाठवून या योजनांच्या परिपूर्तीसाठीचे वेळापत्रक कळविले आहे. हे परिपत्रक मिळताच शाळा-महाविद्यालयांनी विशेषत: व्यावसायिक आणि तंत्र शिक्षण संस्थांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांनाही लागूमहाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबरोबरच कर्नाटकातील सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांनाही या योजना लागू असल्याने त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. यासाठी त्यांना सीमाभागातील रहिवासाचे कर्नाटकचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही लाभशाळा, महाविद्यालयांबरोबरच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणारे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅँड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर आॅफ बिझनेस मॅनेजमेंट, मॉस्टर आॅफ मॅनेजमेंट स्टडीज, मास्टर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या अभ्यासक्रमांनाही या योजनांचा लाभ मिळणार आहे.उच्च व तंत्र शिक्षण महाविद्यालयांना ईबीसी सवलतीच्या मर्यादा वाढीचे परिपत्रक पाठविण्यात आले असून, आॅनलाईन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. - डॉ.अजय साळी,सहसंचालक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, कोल्हापूर