शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ

By admin | Updated: March 18, 2016 04:05 IST

महिलांचे सबलीकरण आणि त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारचा दावा काहीही असला तरी राज्यातील महिला आजही असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत राज्यात महिलांवरील

मुंबई : महिलांचे सबलीकरण आणि त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारचा दावा काहीही असला तरी राज्यातील महिला आजही असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांचे अपहरण करणे वा त्यांना पळवून नेण्याच्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ झाली आहे. विधानसभेत आज सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात सामाजिक क्षेत्रावर प्रकाश टाकताना ही माहिती देण्यात आली आहे. २०१३ मध्ये महिलांवरील बलात्काराच्या ३०६३ घटना घडल्या होत्या. २०१४ मध्ये ही संख्या ३४३८ वर गेली. २०१५ अखेर हा आकडा ४१७६ वर गेला आहे. अपहरणाच्या घटना पहिल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८७४, २४५७ अशी होती. २०१५ मध्ये अपहरणाच्या ४८६४ घटना घडल्या. महिलांच्या विनयभंगाच्या ११६९६ घटना गेल्या वर्षी घडल्या. २०१३ मध्ये ही संख्या ८१३२ तर त्यानंतरच्या वर्षी १०००१ इतकी होती. लैंगिक अत्याचाराच्या घटना मात्र कमी झाल्या. त्यांची संख्या तीन वर्षांत अनुक्रमे २६३२, १५७५ आणि ९८६ अशी होती. (विशेष प्रतिनिधी)बालक अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ- बालकांचे अपहरण वा त्यांना पळवून नेण्याच्या घटना २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये तिपटीने वाढल्या. - २०१४ मध्ये २६१६ बालकांचे अपहरण झाले होते. २०१५ मध्ये ६५७६ बालकांचे अपहरण झाले. - बालकांच्या खुनाचे प्रमाण मात्र घटले. २०१४ मध्ये २०७ तर नंतरच्या वर्षी १४३ खून झाले.