शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वेश्याव्यवसायातील पीडितांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या भत्त्यात वाढ

By admin | Updated: November 18, 2016 06:03 IST

तरुणींना त्यांच्या स्वत:च्या घरी पोहोचविण्यासाठी पोलिसांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.

जमीर काझी / मुंबई : वेश्याव्यवसायातून सुटका केलेल्या महिला, तरुणींना त्यांच्या स्वत:च्या घरी पोहोचविण्यासाठी पोलिसांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या प्रवासासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करून ही ड्युटी करणाऱ्या पोलिसांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त दैनंदिन भत्त्यात पूर्वीच्या तुलनेत तब्बल पाच वर्षांनी सरासरी दीडपट ते दुपटीने वाढ करण्यात आली आहे. पीडित मुलगी, महिलेला त्याच जिल्ह्यातील घरी सोडावयाचे असल्यास ३०० रुपये तर जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी ४५० रुपये संबंधित बंदोबस्तावरील पोलिसाला दिले जाणार आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यासाठी आतापर्यंत अनुक्रमे १५० व ३०० रुपये दिले जात होते. ‘एस्कॉर्ट’च्या कामासाठी बहुतांशवेळा सशस्त्र दल (एल ए), मुख्यालयात नियुक्तीला असलेल्या पुरुष व महिला कॉन्स्टेबलची नेमणूक केली जाते. वाढत्या महागाईमुळे त्यांना घरी पोहोचविण्यासाठी लागणारी देण्यात येणारी रक्कम अपुरी पडत असे. तसेच संबंधित पोलिसाला स्वत:च्या पैशाची पदरमोड करावी लागत होती. त्यामुळे त्यांच्या मोबदल्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अडीच वर्षांपासून होत होती. अखेर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलाहोता. राज्य सरकारने त्याला नुकताच हिरवा कंदील दिला आहे. त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने त्याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. (प्रतिनिधी)