शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय सेवेसाठी वयोमर्यादेत वाढ

By admin | Updated: April 24, 2016 03:10 IST

शासकीय सेवेसाठी वयाच्या कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ, ग्रामीण भागासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना आणि वस्त्रोद्योग प्रकल्पांना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान देणे

मुंबई : शासकीय सेवेसाठी वयाच्या कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ, ग्रामीण भागासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना आणि वस्त्रोद्योग प्रकल्पांना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान देणे, असे काही निर्णय राज्य सरकारने घेतले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जिल्हा निवड समित्या आणि विविध मंत्रालयीन विभागांनी नियुक्त केलेल्या निवड समित्यांमार्फत शासन सेवा प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरिता वयोमर्यादा पाच वर्षांनी वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सध्या असलेली कमाल वयोमर्यादा ३३ वरून ३८ वर्षे होणार असून, मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्याची ३८ वर्षांची वयोमर्यादा आता ४३ वर्षे होणार आहे. याशिवाय सध्याच्या ज्या प्रवर्ग किंवा घटकांची कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नाही.ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा विचार करून तेथील जनतेला पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी २०१६ ते २०२०या कालावधीत ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. त्यासाठी २५०० कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नवीन पेयजल योजना, बंद योजनांचे पुनरुज्जीवन आणि ग्रामीण पाणी योजनांची देखभाल दुरुस्ती ही कामे करण्यात येतील. राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवरील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील जीन बँकेचे बळकटीकरण करून जनुकांच्या जतनासाठी येणाऱ्या १० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)मराठवाडा-विदर्भातील उद्योगांना होणार फायदावस्त्रोद्योग प्रकल्पांना वस्त्रोद्योगाच्या प्रकारानुसार व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्रांतील वस्त्रोद्योग प्रकल्पांना अतिरिक्त १० टक्के भांडवली अनुदान देण्याची सध्याची योजना कायम राहणार आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना विशेषत्वाने होणार आहे. या तिन्ही भागांत वस्त्रोद्योग प्रकल्प पूर्ण होऊन तो उत्पादनाखाली आल्यानंतर त्यांना एकूण देय अनुदानाच्या १५ टक्के एवढा भांडवली अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात येईल, तसेच वस्त्रोद्योग संचालकांनी प्रकल्प पुढे चालू असल्याबाबतचे दरवर्षी प्रमाणित केल्यानंतर उर्वरित अनुदान सहा समान हप्त्यांत देण्यात येईल.