शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चुकून ‘नि’ चा ‘स’ झाला

By admin | Updated: January 19, 2017 06:22 IST

गुजरात पोलिसांच्या कथित चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँच्या कुटुंबीयांना यापुढेही नि:शुल्क पोलीस संरक्षण मिळणार आहे.

राजू ओढे,

ठाणे- गुजरात पोलिसांच्या कथित चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँच्या कुटुंबीयांना यापुढेही नि:शुल्क पोलीस संरक्षण मिळणार आहे. पोलीस संरक्षणाचा खर्च भरण्याबाबतची नोटीस तिच्या कुटुंबीयांना पोलिसांनी बजावल्यानंतर वादंग निर्माण झाले होते. प्रत्यक्षात त्या नोटीसमध्ये ‘नि:शुल्क’ऐवजी चुकून ‘सशुल्क’ असा उल्लेख करण्यात आला होता, असे पोलिसांनी स्पष्ट केल्याने या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.१५ जून २००४ रोजी गुजरातमध्ये झालेल्या एका चकमकीत चौघांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये १९ वर्षीय इशरत जहाँचाही समावेश होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उधळून लावण्यासाठी ही कारवाई केली असून चकमकीत ठार झालेले चारही जण लष्कर-ए-तय्यबाचे अतिरेकी असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तेव्हापासून मुंब्रा येथे वास्तव्यास असलेल्या इशरत जहाँच्या कुटुंबास २४ तास पोलीस संरक्षण देण्यात आले होते. वेगवेगळ्या कारणांसाठी अशा प्रकारे मोफत पोलीस संरक्षण पुरवण्यात आलेल्या सर्व प्रकरणांचा पोलीस खात्यामार्फत नियमित आढावा घेतला होता. त्यानुसार, ३० नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर इशरतची आई शमिमा कौसर हिला पोलिसांनी नोटीस बजावून पोलीस संरक्षणापोटी १ हजार ७२३ रुपये दररोज याप्रमाणे खर्च भरण्यास सांगितले होते. १ हजार ७२३ रुपये दररोज याप्रमाणे गत तीन महिन्यांचा खर्च जमा केला, तरच पोलीस संरक्षण यापुढेही पुरवले जाईल, असेही पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले होते.मुंंब्रा येथे शमिमा कौसर यांच्यासोबत इशरतचा अविवाहित भाऊ आणि बहीण वास्तव्यास आहे. कुटुंबाचे उत्पन्न पुरेसे नसल्याने पोलीस संरक्षणापोटी दिवसाकाठी १ हजार ७२३ रुपयांचा खर्च आपणास झेपणारा नसल्याचे शमिमा कौसर यांनी स्पष्ट केले होते.आपल्या कुटुंबास पोलीस संरक्षणाची गरज आहे, परंतु मासिक उत्पन्न जेमतेम १२ हजार रुपये असल्याने संरक्षणाचा खर्च आपण सोसू शकत नाही, असे त्यांनी पोलिसांना कळवले होते. इशरत जहाँ चकमक प्रकरणाचा वाद अद्याप पूर्णत: मिटलेला नाही. मुंबई हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला अतिरेकी डेव्हिड हेडली याने इशरत ही ‘लष्कर’शी संबंधित असल्याचा जबाब नोंदवल्यानंतर हे प्रकरण नव्याने चर्चेत आले. अशातच पोलिसांनी इशरतच्या कुटुंबीयांना संरक्षणाचा खर्च भरण्याबाबत बजावलेल्या नोटीसमुळे वाद निर्माण झाला होता. >..ही तर पोलिसांनी काढलेली पळवाट‘नि:शुल्क’ऐवजी चुकून ‘सशुल्क’ असा उल्लेख करण्यात आला होता, असा दावा पोलिसांनी केला असला तरी दिवसाकाठी १ हजार ७२३ रुपये भरा हा उल्लेख त्यात कसा काय झाला. हा ‘ध’चा ‘मा’ होण्याचा प्रकार नाहीच, ही तर पोलिसांची पळवाट आहे, असे इशरतप्रेमींचे म्हणणे आहे.इशरतच्या आईने तिची बाजू स्पष्टपणे मांडल्यानंतर नोटीस चुकून बजावण्यात आली होती, असे स्पष्ट केले आहे. शमिमा कौसर यांना बजावलेल्या नोटीसमध्ये ‘नि:शुल्क’ऐवजी चुकून ‘सशुल्क’ असा उल्लेख करण्यात आला होता, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. इशरतच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण यापुढेही मोफतच पुरवले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.