शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बदलीबाबत संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 06:12 IST

मुंबईत कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिका-यांनी बदलीसाठीची तीन ठिकाणे सुचविलेली बंधपत्रे पाठविली आहेत.

जमीर काझी  मुंबई : पुढील महिन्यात पोलीस दलातील अधिकाºयांच्या सर्वसाधारण बदल्या (जीटी) होणार आहेत. मुंबईत कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाºयांनी बदलीसाठीची तीन ठिकाणे सुचविलेली बंधपत्रे पाठविली आहेत. मात्र महिना उलटूनही ती निर्णयाअभावी पोलीस आयुक्तालयात पडून आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील जवळपास हजाराहून अधिक अधिकाºयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यंदा बदली होणार की नाही आणि झाली तर आपल्या इच्छेविरुद्ध मुख्यालयातील अधिकाºयांच्या मर्जीनुसार केली जाईल, असे अनेक प्रश्न त्यांना सतावत आहेत.महाराष्टÑ पोलीस अधिनियम कलम-२२ नुसार अधिकाºयांसाठी मुंबई आयुक्तालय व एका परिक्षेत्रासाठी आठ वर्षे तर अन्य आयुक्तालयांसाठी ६ वर्षांचा कार्यकाळ निश्चित केला आहे. चार वर्षांपासून हा बदली अधिनियम लागू असला तरी जवळपास ५० हजार मनुष्यबळ असलेल्या मुंबई पोलीस दलात त्याची अपवादात्मक अंमलबजावणी झाली आहे. कारण अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वरील मुंबई पोलीस दलात अन्य घटकांतून काम करण्यास येण्यास बहुतांश अधिकाºयांची इच्छा नसते. त्यामुळे मंजूर संख्येइतके अधिकारी कधीच मिळत नाहीत, तर मुंबईत काम करणारे अनेक जण बाहेर जाण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे त्यांना बाहेर पाठविले जात नाही. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या ४ हजारांवर पोलीस अधिकाºयांपैकी निम्म्या जणांची सर्व सेवा मुंबईतच झाल्याची स्थिती आहे.या वर्षी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्यातर्फे ९ जानेवारीला जारी केलेल्या परिपत्रकामध्ये कार्यकाळ पूर्ण झालेल्या तसेच विनंती व कारवाईनुसार बदली करायच्या अधिकाºयांचे प्रस्ताव फेबु्रवारीपर्यंत पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाºयांनी बदलीसाठीची तीन ठिकाणे सुचविलेली बंधपत्रे प्रशासन विभागाकडे पाठविली. मात्र ती पोलीस आयुक्तालयाकडून महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यातच आलेली नाहीत. त्यामुळे आमच्या विनंतीनुसार बदली केलीच जाणार नसेल, तर विवरणपत्रे का मागवून घेतली? स्वत:च्या बदलीसाठी व्यवस्थित ‘फिल्डिंग’ लावणाºया आयपीएस अधिकाºयांनी प्रत्यक्षात रस्त्यावर राबणाºयांचा कधी तरी विचार केलाय का, असा सवाल हे पोलीस खासगीत बोलताना करीत आहेत. तसेच पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी स्वत: याबाबत लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.